सोमेश्वरनगर : श्रीमंत अंबामाता ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने वाघळवाडी येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सातारा येथील सज्जनगडावरुन शिवज्योत आणण्यात आली. या वेळी दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवजयंतीनिमित्त अंबामाता ग्रामस्थ मंडळाने नीरा येथून शिवज्योतीची भव्य मिरवणूक काढली होती. या वेळी नीरेतील दत्ता चव्हाण यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. तसेच पुढेही शिवज्योतीची दुचाकीवरून काढण्यात आलेली रॅली सोमेश्वर कारखाना येथील शिवाजी पुतळ्याच्या प्रांगणात पोहोचली. ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, विशाल गायकवाड, किशोर भोसले, लक्ष्मण गोफणे, कार्यकारी संचालक तावरे यांनी शिवज्योतीचे स्वागत करून या मिरवणुकीचे कौतुक केले. वाघळवाडीमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅली समाप्त झाली. (वार्ताहर)
सज्जनगडावरून आणली शिवज्योत
By admin | Updated: February 20, 2017 02:24 IST