शिवजयंतीनिमित्ताने महाराणा येसूबाई विचारमंच जुन्नर यांच्या वतीने शिवजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
जुन्नर येथील मराठा ज्ञाती विद्या विकास निधी संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पोवाडे, स्फूर्तिगीत, शिवचरित्रपर व्याख्यान, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाचे नियोजन कार्यवाह अनिता ढोबळे, कुसुम दुराफे, पूनम माने, सुजाता ढोबळे, माधुरी म्हसकर, कांता म्हसकरे यांनी केले.
या वेळी झालेल्या स्पर्धेत अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर व शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्ञानेश्वरी दातीर, कृष्णा चिलप, रचित वाबळे, जान्हवी आमले, संस्कृती माने, शुभ्रा धावले, मधुरा माने, ओम भागवत, साई भागवत, वेदांत चिखले, सृष्टी हांडे, वैष्णवी खिलारी, आर्या केदारी, अनुजा केंगले, शुभम गुंजाळ, मधुरा पापडे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
१९ जुन्नर येसूबाई
शिवजन्म सोहळ्यात उपस्थित महाराणा येसूबाई विचार मंचच्या सदस्या.