शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

शिवाजीनगर पोलीस वसाहत २० मजली!

By admin | Updated: March 19, 2017 05:13 IST

पोलिसांच्या घराचा प्रश्न संवेदनशील बनलेला असतानाच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये नवीन घरांचे बांधकाम सुरू करण्यात येणार

पुणे : पोलिसांच्या घराचा प्रश्न संवेदनशील बनलेला असतानाच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये नवीन घरांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. तीन ते साडेतीन एकरांच्या आवारात पसरलेल्या बैठ्या चाळी तोडून त्या ठिकाणी तब्बल २० मजल्यांचे ६ टॉवर उभारण्यात येणार आहेत. पोलिसांना राहण्यासाठी प्रशस्त असे ‘टू बीएचके’ उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चालू वर्षातच निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा भाग येतो. सध्या १० हजारांच्या आसपास मनुष्यबळ पोलिसांकडे आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे. शिवाजीनगर, सोमवार पेठ, औंध, भवानी पेठ, स्वारगेट आदी भागांमधील पोलीस वसाहतींमधील घरांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा यादी आहे. या घरांचीही अवस्था म्हणावी तशी चांगली राहिलेली नाही. देखभाल-दुरुस्तीसह एकूणच स्वच्छतेचाही मोठा प्रश्न या वसाहतींमध्ये आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही पोलिसांच्या कुटुंबांना अनेकदा संघर्ष करावा लागलेला आहे.शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाला लागूनच पोलीस वसाहत आहे. या वसाहतीमध्ये ३ इमारतींसह जवळपास अडीचशे बैठी घरे आहेत. साधारणपणे तीन ते साडेतीन एकर परिसरात ही वसाहत वसलेली आहे. बैठ्या घरांमध्ये राहणाऱ्या पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना दोन वर्षांपासून अन्य वसाहतींमध्ये जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणे हलविण्यात येत आहे. यासाठी मुख्यालयाकडून पोलिसांकडून अर्जही घेण्यात आले आहेत. आता थोडकी कुटुंबे बैठ्या चाळींमध्ये राहत आहेत. त्यांनाही जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या वसाहतीमधील बैठ्या चाळी तोडून तेथे २० मजल्यांचे ६ टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीचा सविस्तर प्लॅनही पोलिसांनी तयार केलेला आहे. तसा प्रस्ताव पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास ७८ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. बड्या बांधकाम कंपन्यांकडून उभारण्यात येणाऱ्या आलिशान सोसायट्यांप्रमाणेच ही सोसायटी असेल. त्यामध्ये लहान मुलांसाठी खेळणी, बाग, पादचारी मार्ग, व्यायामशाळा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. या वर्षामध्येच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून लवकरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलिसांसाठी उभ्या रहात असलेल्या या टॉवरमुळे पोलिसांचेही जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल. एकूणच या प्रक्रियेमुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मुख्यालयालाही येणार झळाळीशिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्येही मुख्य प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी ५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या इमारतीमध्ये मुख्यालयाच्या उपायुक्तांसह सहायक आयुक्त, निरीक्षकांचे कक्ष असतील. यासोबतच अधिकाऱ्यांसाठी ३० पेक्षा अधिक खोल्यांचा विश्रांती कक्षही असेल. ही इमारत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यात येणार आहे. तळमजला आणि वर दोन मजले असे तिचे स्वरूप असेल. राज्यामध्ये मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा पथदर्शी प्रकल्प असून, त्याचीही निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.तीन एकरांवर वीस-वीस मजल्यांचे ६ टॉवर उभे राहणार आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये जवळपास ८० सदनिका असतील. प्रत्येक मजल्यावर ४ सदनिका असणार आहेत. साधारणपणे ६ इमारतींमध्ये मिळून ४८० सदनिका पोलिसांसाठी उपलब्ध होणार आहेत. सहाशे ते साडेसहाशे चौरस फुटांच्या प्रशस्त सदनिका बांधण्यात येणार आहेत.