शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीमहाराज मॅनेजमेंट गुरूच

By admin | Updated: January 19, 2016 01:53 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुष्काळासारख्या समस्यांवर ज्या प्रकारे उत्तम उपाययोजना केल्या होत्या, त्यावरूनच महाराज हे सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू होते,

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुष्काळासारख्या समस्यांवर ज्या प्रकारे उत्तम उपाययोजना केल्या होत्या, त्यावरूनच महाराज हे सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू होते, हे दिसून येते. हीच बाब विद्यार्थ्यांपर्यंत पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमातून येण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ यांच्या सीबीएससी, बी. फार्मसी, डी. फार्मसी व टेक्नॉलॉजी या इमारतीच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते; त्या वेळी ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष एम. एन. नवले, एमआयटीचे सचिव मंगेश कराड, मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत छाजेड, कॉसमॉस बँकेचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते रसिकलाल व शोभा धारिवाल यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.जैन विद्या प्रसारक मंडळ व रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने सीबीएससी बोर्डाशी संलग्न अभ्यासक्रम सुरू केला आहे. विविध अभ्यासक्रम व इमारतीसाठी फाउंडेशनच्या वतीने मंडळास नऊ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. पाच कोटी रुपये सीबीएससी इंग्रजी माध्यम शाळेसाठी, दोन कोटी रुपये फार्मसी अभ्यासक्रमासाठी, तर दोन कोटी रुपये पॉलिटेक्निक विभागासाठी देण्यात आले आहेत. या देणगीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते.रसिकलाल धारिवाल म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा वसा घेतला की, ती गोष्ट सर्वोत्तम पद्धतीने झाली पाहिजे, असा माझा पहिल्यापासूनच आग्रह आहे. त्यामुळे सुरू केलेले सीबीएससी इंटरनॅशनल स्कूल सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न करू, ज्याचा पालकांनाही अभिमान वाटायला हवा. शोभा धारिवाल म्हणाल्या की, सीएसआरअंतर्गत विविध संस्थांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. स्वागत राजेशकुमार साकला यांनी केले. आभार प्रकाश चोपडा यांनी मानले. आयोजन धनंजय कुलकर्णी व सतीश भारती यांनी केले. जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना सन १९२७ साली करण्यात आली. सुमारे १५००० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. ६०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. रसिकलाल एम. धारीवाल फाउंडेशन आरोग्यसेवा, जनावरांसाठी चारापुरवठा, वृक्षारोपण, नेत्रशिबिर पाणीपुरवठा आदी उपक्रम राबवीत आहे.