शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पेरिविंकल स्कूलमध्ये शिवजंयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:17 IST

पिरंगुट : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सुस शाखेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिव जन्मोत्सव ...

पिरंगुट : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सुस शाखेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिव जन्मोत्सव म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला हा अप्रतिम सोहळा असतो. याच अनुशंगाने सुस येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, समन्वयिका निर्मल पंडित व पर्यवेक्षिका शिल्पा क्षीरसागर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाला. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जन्माचे पाळणागीत ते शिवराज्याभिषेक सोहळ्या पर्यंत सर्व प्रसंग अत्यंत कल्पकतेने व उत्तमरीत्या सादर केले. कार्यक्रमाची स्फूर्ति वाढवण्यासाठी इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यानी स्फूर्ति गीते सादर केली. याच बरोबर अंगावर शहारे आणणारे पोवाडे देखील गायले.

सुस शाखेच्या समन्वयिका निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शिल्पा क्षीरसागर, शिल्पा थुल व इतर सहकारी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन निशा चांदेरे या विद्यार्थिनीने केले.

फोटो ओळ : पेरिविंकल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी