शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

माधव भांडारींच्याविरोधात शिवसेनेने थोपटले दंड

By admin | Updated: June 25, 2016 00:44 IST

शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी मंडईमध्ये टिळक पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचा भडिमार केला

पुणे : शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी मंडईमध्ये टिळक पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचा भडिमार केला. माधव भांडारीचा हायहाय करीत निषेध करण्यात आला, तर शहा यांना कल्लूमामाची उपमा देण्यात आली. भांडारी यांनी तोंड बंद करावे; अन्यथा शिवसैनिक त्यांना त्यांची लायकी दाखवून देतील, असा इशारा देण्यात आला.भाजपाच्या ‘मनोगत’ या मासिकात भांडारी यांनी लेख लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोलेमधील अभिनेते असरानी यांच्याशी केली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. त्यात माधव भांडारींच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. शहा यांना कल्लूमामा म्हणून हिणवण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात येत होत्या.पक्षाचे पालिकेतील गटनेते अशोक हरणावळ, शहर संघटक शाम देशपांडे, गजानन पंडित, नगरसेवक संजय भोसले, संजय मोरे, संदीप मोरे, नगरसेवक सनी निम्हण, शहर समन्वयक शिरीष आपटे, माजी शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, नगरसेविका संगीता ठोसर, विभागप्रमुख दीपक कुंजीर, हनुमंत दगडे, कुणाल शेलार, दत्ता घोडके, संतोष भुतकर, जगदीश भणगे, उमेश भेलके, ऋषीकेश कुंबरे, अनिकेत कपोते, सूरज काटे, उमेश वाघ, अतुल दिघे, राजेश पळसकर, निर्मला केंढे, राधिका हरिश्चंद्रे, सुदर्शना त्रिगुणाईत, कस्तुरी पाटील, छाया भोसले, भावना थोरात, रूपा शिंदे, अमृत पठारे, सविता बलकवडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) ४या वेळी निम्हण म्हणाले, ‘‘भांडारी यांची शिवसेनेसंदर्भात बोलण्याची लायकी नाही. त्यांच्याच पक्षात त्यांना कोणी विचारीत नाही. त्यांनी आपले तोंड बंद ठेवावे; अन्यथा शिवसैनिक त्यांना त्यांची लायकी दाखवून देतील. भाजपाला सत्तेची सूज आली आहे. ती उतरण्यास वेळ लागणार नाही. शिवसेनेच्या नादी लागाल तर रस्त्यावर फिरणे अवघड होईल.’’४भांडारी यांच्या विडंबनात्मक प्रतिमेला महिला शिवसैनिकांनी चपलांचा हार घातला. कल्लूमामा म्हणून शहा यांची प्रतिमा झळकावण्यात येत होती. या दोघांच्या प्रतिमांचे या वेळी दहन करण्यात आले. ‘भांडारी हाय हाय’ याबरोबरच शहा यांच्या विरोधातही शिवसैनिक मोठ्याने घोषणा देत होते.