शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला आज एसटी रोको आंदोलन

By admin | Updated: June 27, 2014 22:27 IST

‘बीओटी’संदर्भात पाहणी करण्यासाठी विभाग नियंत्रकाने शिरूर आगारास अनेकदा भेटी दिल्या.

शिरूर :  ‘बीओटी’संदर्भात पाहणी करण्यासाठी विभाग नियंत्रकाने शिरूर आगारास अनेकदा भेटी दिल्या. मात्र, हा विषय आपल्या अखत्यारीतला नसल्याने विभाग नियंत्रक सांगत जबाबदारी झटकत असल्याने, उद्या (शनिवारी) बसस्थानकात येणा:या व जाणा:या एसटीबसेस रोखून धरण्यात येणार आहेत, असे उपोषणकर्ते संजय पाचंगे यांनी तहसीलदार रघुनाथ पोटे यांना सांगितले. पाचंगे यांचा उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज तहसीलदार पोटे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. विभाग नियंत्रकांशी चर्चा केली. 
मात्र, हा विषय आपल्या अखत्यारीतला नसल्याने विभाग नियंत्रक सांगत असल्याचे पोटे यांनी पाचंगे यांना सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून पुण्याहून नगरकडे व नगरहून शिरूरकडे जाणा:या एसटी बसेस शिरूर बसस्थानकात येण्यास नकार देत असल्याची मोठी समस्या असताना, विभाग नियंत्रकाने येथे येऊन याची दखल घेतली नाही. 
मात्र, ‘बीओटी’च्या कामासंदर्भात विभाग नियंत्रकाने आगारास अनेकदा भेटी दिल्या. बसस्थानक आवारातील दुकानदारांना दुकाने खाली 
करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या, त्यादेखील विभाग नियंत्रकाच्या सहीनेच आहेत. अशात हा विषय आपल्या अखत्यारीतला नाही, असे सांगून विभाग नियंत्रक कोणाची दिशाभूल करताहेत, असा प्रश्न पाचंगे यांनी केला.
मग, हा प्रकार रोखण्यासाठीही ज्यांची जबाबदारी आहे त्यांनीच यावे, असे आव्हान पाचंगेंनी विभाग नियंत्रकास दिले. युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी आज पाचंगेना पाठिंबा दर्शविला.
रिक्षा पंचायत, रामलिंग सहाआसनी, पियागो रिक्षा संघटना यांनीही पाचंगे यांना पाठिंबा दर्शविला. 
वैयक्तिकरीत्या नागरिकांचाही पाठिंबा वाढतानाचे चित्र आहे.
(वार्ताहर)
 
4शिरूर बसस्थानकाचा बीओटी प्रकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी निगडित असल्याने ते अप्रत्यक्षरीत्या प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पाचंगे यांनी केला. प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याने, उद्या बसेस रोखून धरण्यात येणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.