शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शिरूरला आघाडीचे प्रकाश धारिवाल : स्वीकृत सदस्यपदी विजय दुगड व संजय देशमुख यांची निवड

By admin | Updated: February 16, 2017 02:43 IST

नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदी विजय दुगड

शिरूर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदी विजय दुगड व शिवसेना शहरप्रमुख संजय देशमुख यांची निवडही पीठासन अधिकारी, नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी जाहीर केली.नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे. उपनगराध्यक्षपदासाठी विहित वेळेत धारिवाल यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने पीठासन अधिकारी वाखारे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. स्वीकृत सदस्यपदासाठी आघाडीने सर्वसहमतीने शिक्कामोर्तब केलेली दुगड व देशमुख यांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या दोघांच्या अर्जांची छाननी करून, हे दोन्ही अर्ज वैध ठरवले. या कार्यालयाकडून आलेली नावे आज वाखारे यांनी जाहीर केली.नगराध्यक्षा वाखारे यांच्या हस्ते धारिवाल, दुगड व देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना धारिवाल म्हणाले की, मला तिसऱ्यांदा उपनगराध्यपदाची संधी मिळाली. गेली दहा वर्षे पदाचा व सत्तेचा उपयोग फक्त शहराच्या विकासासाठीच केला. पारदर्शक कारभाराचा आदर्श सर्वांसमोर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. येथून पुढे विकास व पारदर्शकता हाच अजेंडा ठेवून काम करणार. दुगड म्हणाले की, स्वीकृत सदस्य होण्याची ही दुसरी संधी असून, मागील पाच वर्षांत जसे विकासाभिमुख काम केले, तसेच पुढील पाच वर्षांत काम करून जनतेला आघाडीने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. देशमुख म्हणाले की, नगर परिषदेच्या विकासात शिवसेना या माझ्या पक्षाचा व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सहकार्याचा सहभाग असेल, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, नेते प्रभाकर डेरे, सचिव मनसुख गुगळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, मनीषा गावडे, उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, सुनीता कालेवार, रवींद्र ढोबळे, संघपती शांतिलाल कोठारी, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, आजी, माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, नागरिकांनी उपनगराध्यक्ष धारिवाल, स्वीकृत सदस्य दुगड व देशमुख यांचा सत्कार केला. (वार्ताहर)