शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर, मुळशीचे वाचले पाणी!

By admin | Updated: January 7, 2016 01:40 IST

जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र

पुणे : जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने बुधवारी दिला. त्यामुळे शिरूर व मुळशी तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. येथील जनता प्राधिकरणाच्या निर्णयाची वाट पाहत होती. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निणर्य प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार होती व मुळशीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार होता.यापूर्वी चासकमान धरणातून ८९.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले होते. धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ८९ दलघमी पाणी सोडले, तर चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३० ते ३५ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यावर येथील सिंचनासाठीचे १ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यात धरणातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू होते. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश होता. यामुळे धरणातील पाणीपातळी खालावली होती. जर पूर्वीचा आदेश कायम ठेवला असता, तर पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळाले नसते. पिकं जळून गेली असती. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास विरोध करीत होते. शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून होते. आज नव्याने निर्णय आला असून, यात धरणातून २०.७० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी ते ८९.१२ दलघमी होते. म्हणजे ६८.४२ म्हणजे २.३० टीएमसी पाणी वाचले आहे. तसेच कुकडी प्रकल्पातून घोड धरणात सुमारे ३४ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशही मंगळवारी प्राधिकरणानी दिले आहेत. याचाही फायदा शिरूर तालुक्याला मिळणार आहे. (प्रतिनिधी)