शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला सर्वच पक्ष विकास आघाडीसोबत!

By admin | Updated: November 14, 2016 02:12 IST

शिरूर व तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्थानिक आघाडीसोबत जाणार असून, इतर नगर परिषदांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

शिरूर : शिरूर व तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्थानिक आघाडीसोबत जाणार असून, इतर नगर परिषदांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजपसह काँग्रेस, शिवसेनेनी आंम्ही शिरूरला आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आघाडी कोणासोबत राहणार याबाबत उत्सुकता लागली असून शहराच्या विकासाच्या राजकारणासाठी सर्व सहमतीचे राजकारण आंम्ही करीत असून जे येतील त्यांना आंम्ही सामावून घेवू अशी भुमिका विकास आघाडीने घेतली आहे.शिरूर शहरात रसिकलाल व प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास झाला आहे. यामुळे आम्ही धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे दोन दिवसांपूर्वी अजीत पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शहर काँग्रेसनेही या आघाडीसमवेत जाण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेनेही आपली भुमिका आघाडीसोबतच जाण्याची असल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र जिल्ह्यातील तीन ते चार नगरपरिषदेचे भाजपाने स्थानिक आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीही स्थानिक शिरूर शहर विकास आघाडीसोबत जाण्याची घघेषणा आमदार बाबूराव पाचर्णे यांनी रविवारी सायंकाळी जाहिर केली. ते भाजपाचे विधानपरिषदेचे उमेदवार आशोक ऐनापूरे यांच्या प्रचारासाठी आले असता, त्यांनी स्पष्ट केले. आमदार पाचर्णे यांनी मागील वर्षभरात अनेक कार्यक्रमांत प्रकाश धारिवाल यांची जाहीर स्तुती करून या वेळी त्यांच्या विरोधात न जाण्याचे संकेत दिले होते. यामुळे ते धारिवालांच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत निवडणूक लढवतील, अशी अनेक दिवसांपासून शहरात चर्चा आहे. यासंदर्भात या दोघांबाबत अनेकदा चर्चाही झाली आहे. मात्र, पाचर्णे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. त्यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, की पक्षाची (भाजपा) स्वबळावर लढण्याचीच मनीषा होती. मात्र, जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी पक्षाने स्थानिक आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिरूरमध्येही स्थानिक शहर विकास आघाडीसोबत जाण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. (वार्ताहर)