शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला २ दिवसाआड पाणी

By admin | Updated: June 19, 2016 04:36 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात जूनअखेर पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, या कारणास्तव शहराला आजपासून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात जूनअखेर पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, या कारणास्तव शहराला आजपासून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने नगर परिषदेने १७ मार्चपासून (२०१५) शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने नगर परिषदेने बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या बंधाऱ्यातून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. या दरम्यान पाणीसाठा अत्यल्प झाल्याने नगर परिषदेने ३ एप्रिलपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. वरील भागातील बंधाऱ्यातून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तेथील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, नगर परिषदेने प्रयत्न सोडला नाही. अखेर वरील बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने १७ एप्रिलला बंधाऱ्यात पाणी आले. हे पाणी आल्याने पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. नगर परिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार कालव्याद्वारे सोडलेले पाणी ५ मे रोजी बंधाऱ्यात पोहोचले. मात्र, याने अर्धाच बंधारा भरला. यानंतर पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.बंधाऱ्यात सध्याची परिस्थिती पाहता जूनअखेर पुरेल इतकेच पाणी उपलब्ध असल्याने आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय नगर परिषदेला घ्यावा लागला.शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसाकुकडी कालव्याद्वारे आलेल्या आवर्तनातून पूर्ण बंधारा भरेल, अशी अपेक्षा होती. मात्र अर्धाच बंधारा भरला. यातच मार्च महिन्यापासून जेव्हा जेव्हा पाणी उपलब्ध झाले तेव्हा बंधाऱ्यातून पारनेरच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतीपंपाद्वारे पाणीउपसा केला. यामुळे बंधाऱ्यात पिण्यासाठी असलेले पाणी झपाट्याने कमी झाले. पारनेरच्या महसूल अधिकाऱ्यांना नगर परिषदेने वेळोवेळी शेतीसाठी घेणारा पाणीउपसा बंद करण्याची मागणी केली. मात्र, या अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले.