शिरूर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा कोणताही परवाना, तसेच पदवी नसताना संपूर्ण शरीर तपासणी शिबिराचे आयोजन करून बोगस व्यवसाय केल्याप्रकरणी श्यामकांत दशरथ भंडारी नामक डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. या क्लिनिकमध्ये संपूर्ण शरीर तपासणी शिबिराचे आयोजन केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास बत्ते यांनी केलेल्या तपासणीत भंडारीकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा परवाना, तसेच पदवी नसल्याचे आढळून आले. (वार्ताहर)
शिरूरला बोगस ‘चेकअप’
By admin | Updated: January 19, 2015 01:52 IST