शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या अर्धवट कामाचा शेखचिल्ली नमुना

By admin | Updated: December 22, 2015 01:38 IST

महापालिकेत कशी अर्धवट कामे केली जातात, त्यासाठी पैसे खर्च केले जातात व नंतर त्या अपुऱ्या कामाचा कसा काहीच उपयोग होत नाही,

पुणे : महापालिकेत कशी अर्धवट कामे केली जातात, त्यासाठी पैसे खर्च केले जातात व नंतर त्या अपुऱ्या कामाचा कसा काहीच उपयोग होत नाही, याचे उदाहरण टँकरना बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेतून पुढे आले आहे .पुण्याच्या परिघाबाहेर गेल्या अनेक वर्षांत नव्याने असंख्य वसाहती झाल्या. कालांतराने त्यांचा पालिकेच्या हद्दीत समावेशही झाला. त्यामुळे त्यांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी पालिकेचीच आहे. हे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येते. ते पुरेसे पडत नाही; त्यामुळे अनेक वसाहतींकडून खासगी टँकर मागविण्यात येतात. पालिका स्तरावर व खासगी स्तरावरही अशा पाण्याच्या टँकरचा काळाबाजार फार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्याला आळा घालायचा म्हणून पालिकेने मध्यंतरी प्रत्येक टँकरला जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) यंत्रणा बसविणे सक्तीचे केले.सजग नागरिक मंचच्या वतीने आयुक्त कुणाल कुमार यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली असून, एकतर जीपीएस यंत्रणा काढून टाकावी किंवा मग या यंत्रणेचा दुसरा भाग पालिकेत त्वरित सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पालिकेच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना असल्याची टीका मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)