शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदोडीत शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: March 27, 2017 02:15 IST

शिंदोडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांनी आज कर्जमुक्तीसह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले

निमोणे : शिंदोडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांनी आज कर्जमुक्तीसह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.शिंदोडी येथे आज (दि. २६) शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांसाठी लाक्षणिक उपोषण केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळून त्यांचा सातबारा कोरा व्हावा, कांद्यासह इतर सर्व शेतमालात योग्य बाजारभाव मिळावा, बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी या कारणांसाठी ग्रामदैवत श्रीविठ्ठल मंदिरामध्ये हे उपोषण झाले. वारंवार पडत असलेले दुष्काळ, कांद्यासह शेतमालास मिळणारा कवडीमोल बाजारभाव, मजुरीचे वाढलेले दर, खते आणि औषधांच्या वाढलेल्या किमती, जमिनीची कमी होत चाललेली उत्पादनक्षमता, शेतीभांडवल, नैसर्गिक आपत्ती इत्यादी विविध कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे. नव्या हंगामासाठी त्याच्याकडे भांडवल शिल्लक नाही. शिवाय बँका आणि पतपेढ्या यांचा तगादा चालू आहे. यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणे आवश्यक आहे तरच शेतकरी जगू शकतो. शासन उद्योगपतींना करोडो रुपयांची सूट देते, मात्र शेतकऱ्यांना योग्य वेळची वाट पाहायला लावत आहे. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरीवर्ग प्रचंड आक्रमक झाला आहे. त्याचाच भाग म्हणून आज शिंदोडी येथील शेतकऱ्यांनी आज ग्रामदैवत श्री विठ्ठलाच्या मंदिरात लाक्षणिक उपोषण केले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून या विभागाचे मंडलाधिकारी डी. एस. पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. योगेश ओव्हाळ, भगवंत वाळुंज, प्रकाश शिंदे, रामकृष्ण गायकवाड, कृष्णकुमार माने, भरत थोरात, विशाल फलके आदींनी या उपोषणात सहभाग घेतला.(वार्ताहर)