शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘झिलमिल सितारों का आंगन’; बहारदार मैफिल

By admin | Updated: January 25, 2016 00:50 IST

हृदयातील भावना चेहऱ्यावर उतरवत सर्वांच्या मने जिंकणारा हीमॅन धर्मेंद्र....‘चौदहवी का चाँद’ होत लिव्हिंग लिजंडचा टप्पा गाठलेली वहिदा रहमान

पुणे : हृदयातील भावना चेहऱ्यावर उतरवत सर्वांच्या मने जिंकणारा हीमॅन धर्मेंद्र....‘चौदहवी का चाँद’ होत लिव्हिंग लिजंडचा टप्पा गाठलेली वहिदा रहमान... वयाच्या १४ व्या वर्षापासून चित्रसृष्टीवर व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जयाप्रदा यांच्याशी रंगलेल्या गप्पांमधून आठवणींचा एक एक धागा गुंफला गेला. अनोख्या रेशीमगाठी जुळत मंच जणू ‘झिलमिल सितारों का आँगन’ बनले... अन् या बहारदार मैफलीत रसिक न्हाऊन निघाले. सिंबायोसिसच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने एसआयएमसीचे संचालक अनुपम सिद्धार्थ यांनी धर्मेंद्र, वहिदा रहमान आणि जयाप्रदा यांच्याशी गप्पांचे धागे विणले आणि यातून तयार झालेल्या रेशमी शालेची प्रेमरुपी ऊब आबालवृद्धांपर्यंत पोहोचली. तिघांच्या कारकिर्दीतील हिट चित्रपटांमधील गाण्यांच्या आणि संवादांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला.धर्मेंद्र म्हणाले, ‘चित्रपटाचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना केवळ अभिनयावरील प्रेमापोटी मी चित्रसृष्टीत आलो. सुरय्या यांच्या ‘दिल्लगी’ या चित्रपटाचे मी अक्षरश: पारायण केले. बिमल रॉय आणि गुरुदत्त यांच्या ‘फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट’मध्ये मी सहभागी झालो आणि नशिबाने माझी निवडही झाली. माझ्या प्रत्येक श्वासात अभिनयाचे प्रेम दडले आहे. कॅमेरा हेच माझे आयुष्य आहे. कॉमेडी, अ‍ॅक्शनवर प्रेम करायला शिकलो. पण, मला नृत्य कधीही जमले नाही.’मी आजवर ७२ अभिनेत्रींबरोबर स्क्रीन शेअर केली आहे, असे सांगत, ‘दिल अभी जवाँ है’ म्हणत धर्मेंद्र यांनी दाद मिळवली. बंदिनी, यमला पगला दिवाना, आती रहेगी बहारें, सत्यकाम, शोले अशा अनेक चित्रपटांच्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या. ‘शोले’ मध्ये माझ्यामुळे अमिताभची निवड झाली, हे तो इतक्या वर्षांनी कबूल करीत वाहवा मिळवत आहे आणि शत्रुघ्न मला शिव्या घालत आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. एका तेलगू चित्रपटात केलेले नृत्य... त्यानंतर गुरुदत्त यांना भेटण्याची मिळालेली संधी... सीआयडी, प्यासा या चित्रपटाच्या आठवणी अशा अनेक आठवणी सांगत वहिदा रहमान यांनी रसिकांसमोर ओंजळ रिती केली. त्या म्हणाल्या, ‘आजच्या काळातील गाणी तात्पुरती लक्षात राहतात.’ (प्रतिनिधी)