शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ९७ हजार कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. दर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ९७ हजार कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. दर महिन्याच्या ७ तारखेला होणारे वेतन अजून मिळाले नसल्याने कर्मचारी चिंतातूर झाले आहेत. वेतनबाबतची अनिश्चितता आणि घर चालविण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेता काही कर्मचारी अन्य व्यवसायाकडे वळले आहेत. कारवाईच्या भीतीने ते छुप्या पद्धतीने व्यवसाय करीत आहे.

राज्य सरकारने आतापर्यंत एसटीसाठी २२०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. मात्र ते वेतन व अन्य बाबीवर खर्च झाले. दिवसेंदिवस एसटीची आर्थिक स्थिती नाजूक होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.

------------------------

पुणे विभाग :

राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात १३ आगार आहेत. त्यात एकूण ४५१६ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहे. त्यांचे वेतनावर महिन्याकाठी ७ कोटी रुपये खर्च होतो. जर यात विमा व अन्य खर्च धरले तर १० कोटींचा खर्च होतो. सध्या मात्र केवळ वेतन दिले जात आहे. त्यावर ७ कोटी रुपये खर्च होतो आहे.

बॉक्स 2

रोज १६ कोटींची कमतरता :

राज्य परिवहन महामंडळाचे एकूण ९७ हजार कर्मचारी आहेत. महिन्याला वेतनावर २८० कोटी रुपयांचा खर्च होतो. कोविड पूर्वी एसटीचे रोजचे उत्पन्न २२ कोटी रुपये होते. ते आता अवघे ९ कोटी रुपये इतके झाले. मिळणाऱ्या ९ कोटीत ७ कोटी रुपये रोजचा खर्च केवळ डिझेलवर होत आहे. उर्वरित २ कोटी कर्मचाऱ्यांचा पगार, वाहनांची देखभाल दुरुस्ती व अन्य बाबींवर खर्च होत आहे. कोविड पूर्वी २२ कोटी रुपये उत्पन असतानादेखील रोजचा खर्च पूर्ण करण्यासाठी ३ कोटींची कमतरता जाणवत होती. आता उत्पन्न ९ कोटी झाले आहे. त्यामुळे आता रोज १६ कोटी रुपयांची एसटीला कमतरता जाणवत आहे.

कोट 1

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मुळात कमी आहे. त्यामुळे ते वेळेवर मिळाले नाही तर त्यांच्या संसाराचे गणित कोलमडून जाते. वेतन लवकर मिळण्यासाठी सरकारने तत्काळ एसटीला आर्थिक सहाय्य केले पाहिजे.

-श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

कोट 2

वेतन प्रदान अधिनियम कायद्याने प्रशासनाने वेतन वेळेवर देणे बंधनकारक आहे. यापूर्वीच आम्ही न्यायालयात केस दाखल केली होती. त्यानंतर पगार वेळेवर होऊ लागल्यावर ती थांबली; परंतु पुन्हा न्यायालयात दावा दाखल करणार आहोत व प्रसंगी आंदोलनही उभे करू. शासनानेही एसटीला मदत करणे आवश्यक आहे. टोल टॅक्स माफ करणे, इंधनाचा अधिभार कमी करणे, प्रवासी करातून सूट देणे आवश्यक आहे.

-संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

कोट 3

कर्मचाऱ्यांचे वेतन हा केवळ एखाद्या विभागापुरता मर्यादित नाही. मुख्यालय ह्या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.

-रामाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, पुणे विभाग, राज्य परिवहन महामंडळ