शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शि. प्र. मंडळीमध्ये ‘परिवर्तन’

By admin | Updated: April 1, 2016 03:31 IST

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व बारा उमेदवारांनी स्पष्ट विजय

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व बारा उमेदवारांनी स्पष्ट विजय मिळवला आहे. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी शिक्षण प्रेमी पॅनलमधील काही उमेदवारांना अटक तर काहींवर गुन्हे दाखल झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. परिणामी शि.प्र.ची निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे दिसून आले. शि.प्र. मंडळीच्या मतदारांनी परिवर्तन पॅनलच्या उमेवारांना कौल देऊन परिवर्तन घडवून आणले.बहुचर्चित शि.प्र. मंडळीच्या २०१६ ते २०२१ च्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षण क्षेत्रासह डॉक्टर, वकील तसेच राजकीय व्यक्ती उतरल्या होत्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्राचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. त्यात शि.प्र. मंडळीचे अध्यक्ष अभय दाढे यांना पोलिसांना बोगस मतपत्रिकांस पकडून अटक केल्याने मंडळीच्या मतदारांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे मतदान करून आपला रोष व्यक्त केला. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करून पारदर्शी कारभार करतील अशा उमेदवारांना निवडून दिले. मंडळीच्या निवडणुकीत प्रथमच पोस्टल मतदानाऐवजी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. एकूण मतदारांपैकी बुधवारी ११५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ७१ पोस्टल मतपत्रिकांचा समावेश होता. गुरुवारी सकाळी ९ वाजत मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात प्रथम पोस्टल आणि त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान झालेल्या मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली. (प्रतिनिधी)सुरुवातीपासूनच परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत ही आघाडी कायम होती. प्रत्येक फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी झालेल्या मतदानाची माहिती देत होते. तिसऱ्या फेरीनंतर परिवर्तन पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे उघड झाल्याने उमेदवारांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. त्याचप्रमाणे एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या.शि. प्र. मंडळीच्या निवडणुकीचा निकालउमेदवारांची नावे आणि मिळालेली मते पुढील प्रमाणे : चंद्रकांत अरगडे २७३, सारंग काळे १२४, गिरीश कुमठेकर २८५, प्रकाश कुलकर्णी ५४, विनोद खेडकर १४, खेराजी नानाजी अ‍ॅण्ड कंपनी ७, पुरुषोत्तम घैसास ३०३, उन्मेष जोशी ३१, चंद्रशेखर जोशी ७३, प्रकाश जोशी २५८, विष्णू जोशी १८८, राजाभाऊ ढेपे ७७, रामचंद्र ढेरे ५१, अभय दाढे १७४, दीपक दाते १००, मंदार देसाई १०५, राजेंद्र पटवर्धन २५६, उदय पाटणकर १९५, लता पिसाळ २२६, अप्पा पंडित ९१, सिद्धराज पंडित ६५, सुधीर पंडित २७, माधव पेंडसे २७१, श्रीराम भालेराव ८६, प्रमोद भांबुरकर ३९, आनंद माटे २२७, माधव रानडे ८९, जयंत शाळीग्राम १२७, श्रीकृष्ण साठे १४९, सुरेश साठे २६, आनंद क्षीरसागर २७.शि.प्र.च्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन निवडून आलेली उमेदवार नावगावमते श्रीकृष्ण चितळेपुणे ८६७वसंत देसाई पुणे ७६३ पुरुषोत्तम कुलकर्णी सोलापूर ७५७केशव वझे पुणे ७५१राजेश पटवर्धन सोलापूर ७४४जयंत किराडपुणे ७४२माधुरी मिसाळ पुणे ७३४मिहिर प्रभुदेसाई पुणे ७१७एस.के.जैन पुणे ७१६सुरेश देवळे मुंबई ६९८दामोदर भंडारी वडगाव ६८१सतीश पवार पुणे ६५८