शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळांवर आली भटकंतीची वेळ

By admin | Updated: May 12, 2017 04:53 IST

इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल होत असत. सहा महिने शेतकऱ्यांच्या जमिनीवर मेंढ्या बसवून ज्वारी, पैसे यांच्या मोबदल्यात शेतकरी मेंढपाळांना मिळत असे. मात्र, आंतरपिके घेण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. मेंढपाळांना जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत. शेतीच्या आधुनिकीकरणामुळे मेंढपाळांना हजारो मेंढ्या जगवण्यासाठी रस्त्याच्या कडेनेच भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. ना चारा, ना पाणी. मेंढ्या बसवण्यासाठी शिल्लक जमिनी उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच आपली पाले ठोकून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.मेंढपाळ दत्तू रामा ठोंबरे याच्याकडे ६०० मेंढ्या उपलब्ध आहेत. त्यांना घेऊन कुटुंबासह ३ महिन्यांपासून ते बाहेर पडलेले आहेत. तीन महिन्यांत तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने आपल्या शेतात मेंढ्या बसवल्या नाहीत. त्यामुळे दोन-दोन मेंढ्या विकून आपले कुटुंब जगवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर, या मेंढ्यांना जगवण्यासाठी तालुक्यात कुठेही जमिनीवर चारा उपलब्ध नाही. दत्तू ठोंबरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना स्वत:ची शेती असताना त्याच्या जनावरांच्या चारापाण्याची सुविधा म्हणून चारा छावण्या उभरल्या जातात. ज्या मेंढपाळांना गुंठाभर जमिनी नसतात, त्यांना मात्र चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. शासनाच्या कोणत्याही सुविधा या मेंढपाळांना मिळत नाहीत. भटकंती करणारा हा समाज स्थिर होण्यापासून वंचित राहिला आहे. शासनाने अशा भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना चारा छावण्यांत समाविष्ट करून घ्यावे, अशी अपेक्षा या मेंढपाळांची आहे.