शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या अपक्ष नगराध्यक्षा शीतल कटारिया राष्ट्रवादीत

By admin | Updated: December 30, 2016 04:28 IST

दौंडच्या अपक्ष नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदार तथा माजी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

दौंड : दौंडच्या अपक्ष नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदार तथा माजी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. दौंडच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. शरद पवार हे अहमदनगर येथून बारामतीला निघाले होते. दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांचे निवासस्थान याच मार्गावर असल्याने दुपारी साडेचारच्या सुमारास ते कटारिया यांच्या निवासस्थानी आले. या ठिकाणी त्यांचा औपचारिक सत्कार झाला. या वेळी नगराध्यक्षा शीतल कटारिया आणि सर्व सहकारी अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शीतल कटारिया यांच्यासह १0 अपक्ष नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना युतीच्या विरोधात निवडून आले होते. दरम्यान, नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचे १४ सदस्य निवडून आले. दरम्यान, नगराध्यक्षपदी अपक्षांची सत्ता तर नगरसेवकपदी राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता आली. एकंदरीतच दौंडच्या जनतेने दोघांनाही अर्धी अर्धी सत्ता दिली. मात्र, नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नगर परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार आहे. शीतल कटारिया यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असला, तरी १0 अपक्ष नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला की नाही, हे गुलदस्तातच आहे.राष्ट्रवादीच्या म्यानात दोन तलवारी कशा?सध्याच्या परिस्थितीत दौंड तालुक्यात राष्ट्रवादीची सूत्रे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्याकडे आहेत, तर दुसरीकडे निवडून आलेल्या नगराध्यक्षा शीतल कटारिया आणि सहकारी १0 नगरसेवक यांची सूत्रे प्रेमसुख कटारिया यांच्याकडे आहेत. थोरात आणि कटारिया यांचा राजकीय सवतासुभा सर्वश्रुत आहे.