शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘तिची’ अधिकारी होण्याची इच्छा होणार पूर्ण

By admin | Updated: July 7, 2017 02:49 IST

घरची परिस्थिती बेताची.. त्यातूनही आईने लोकांच्या घरी काम करून इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण दिले. मनात अधिकारी होण्याची इच्छा..

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : घरची परिस्थिती बेताची.. त्यातूनही आईने लोकांच्या घरी काम करून इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण दिले. मनात अधिकारी होण्याची इच्छा.. पण आर्थिक परिस्थिती आडवी येत असल्याने पुढे काय होणार हा प्रश्न.. मात्र इच्छा असेल तर मार्ग दिसतोच या उक्तीप्रमाणे पुढचे शिक्षण थांबवून नोकरीच्या शोधात असलेल्या बारामती शहरातील वसंतनगर येथील रुचीता गायकवाडला चांगलाच आधार मिळाला. नोकरीसाठी मदत मागण्यासाठी गेलेल्या रुचीताची परिस्थिती समजल्यानंतर माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिला तब्बल ७० हजारांची मदत केली.  बारामती शहरातील वसंतनगर येथील वैशाली सुभाष गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्या लोकांच्या घरी स्वयंपाक व इतर कामे करतात. अशा परिस्थितीतही आपल्या मुलीने मोठे व्हावे, कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे या जिद्दीतून वैशाली गायकवाड यांनी मुलीला इंजिनियरिंगपर्यंतचे शिक्षण दिले. इंजिनियरिंग पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा रुचिताचा मानस होता. परंतु त्यासाठीचा खर्च पेलवणारा नसल्याने शिक्षण थांबवून नोकरीच केलेली बरी या विचाराने रुचीताने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. योगेश जगताप यांनी रुचीताला नोकरीच्या मागे न लागता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. नगराध्यक्ष पदाच्या काळात मिळालेले मानधन ५२ हजार रुपये आणि उर्वरीत १८ हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये रुचीताला देण्यात आले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्या हस्ते रुचीता व तिच्या आई वैशाली गायकवाड यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अमर धुमाळ, नगरसेवक पप्पू चव्हाण, बाळासाहेब जाधव, शारदा मोकाशी, अनिता जगताप, शीतल गायकवाड, अमजद बागवान, अल्ताफ सय्यद, बबलू जगताप, माणिक मोकाशी, अनिल जाधव, भूषण जगताप, सयाजी गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत चंद्रजीत धुमाळ, मेहुल दोशी, अली असगर बारामतीवाला, निलेश महाडिक आदींनी केले.