शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

‘सावली’ने लावले २२ लेकींचे लग्न !

By admin | Updated: July 12, 2015 00:13 IST

मुली नको म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करण्याची मानसिकता वाढत असताना येथील एका स्वयंसेवी संस्थेने अनाथ मुलींचे संगोपन करुन त्यांना समाजात आधार मिळवून दिला.

- महेंद्र कांबळे,  बारामतीमुली नको म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करण्याची मानसिकता वाढत असताना येथील एका स्वयंसेवी संस्थेने अनाथ मुलींचे संगोपन करुन त्यांना समाजात आधार मिळवून दिला. या संस्थेने एक-दोघींना नव्हे तब्बल २२ लेकींना लहानचे मोठे करत त्यांचे विवाह लावून दिले. आजही या संस्थेच्या अंगणात पंचवीसहून अधिक मुले-मुली बागडताहेत. सावली अनाथालयाचे संस्थापक महेश अहिवळे, त्यांची पत्नी झरीना यांनी अनाथ मुलामुलींचे पालकत्व घेतले. समाजकार्याची (एमएसडब्ल्यू) पदवी घेतल्यानंतर दोघांनीही स्वयंसेवी संस्थांमध्ये नोकरी स्वीकारली. पण, काही वर्षांनी स्वत:ची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच येथे १९९७-९८ मध्ये सावली अनाथालय सुरू झाले. जळोची भागातील एका छोट्या खोलीत त्यांनी अनाथांचे संगोपन सुरू केले. या कामासाठी पुढे त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारत मिळवून दिली. सुनेत्रा पवार यांनीही हातभार लावला. आज ‘सावली’च्या माध्यमातून अहिवळे यांनी २२ मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांचे विवाह लावून दिले. दरवर्षी दिवाळीला या लेकी आवर्जून माहेरी म्हणजे ‘सावली’त येतात. जावईबापूही येतात. तेव्हा सावलीचे गोकुळ गजबजून जाते. निराधार, आई वडिलांचे छत्र हरपलेले, पालक व्यसनाधीन आहेत अशा अनेक मुलांना या संस्थेने पोटाशी कुरवाळत त्यांना मायेची उब दिली. आम्ही अनाथांचे आई, बाबा झालो. देणगीसाठी कधी कोणाकडे गेलो नाही. पण, अनेकांनी मदतीचा हात पुढे केला, त्यातूनच सावली उभी राहिली, अशी कृतज्ञता हे दाम्पत्य व्यक्त करते.