शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

शशीजींची कर्करोग रुग्णांवरही मायेची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:04 IST

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल

विश्वास खोड पुणे : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल, तर ते लोणीमधील बंगल्यात मुक्कामी असत. लोणी हे त्यांचे आवडते ठिकाण होते. कर्करुग्णांना भेटण्यासाठी, मदत करण्यासाठी हा संवेदनशील मनाचा अभिनेता मंगळवार पेठेत अनेकदा आल्याचीही आठवण आहे.राज कपूर यांनी लोणीमध्ये जमीन खरेदी करून स्टुडिओ बांधला. निसर्गरम्य अशा या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रणही झाले आहे. लोणी काळभोरमधील एका शाळेला स्व. पृथ्वीराज कपूर यांचे नाव राज कपूर यांच्या आग्रहावरून देण्यात आले आहे. राज कपूर यांचा या गावातील तालेवार मंडळींकडे अधूनमधून राबता असे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रामचंद्र काळभोर यांच्याकडेते भोजनासाठीही आल्याची आठवण आहे.शशी कपूर कर्करुग्णासांठी काम करणाºया ‘सिप्ला’ संस्थेशीही संलग्न होते. अशा रुग्णांना ते स्वत: भेटून दिलासा देत असत. सुमारे १२ वर्षांपूर्वी पुण्यात राहणाºया शकुंतला बारणे (५७, मंगळवार पेठ) नामक महिलेला भेटण्यासाठी आपण शशी कपूर यांच्यासमवेत गेलो एका वाड्यात गेलो होतो, अशी आठवण रामचंद्र काळभोर (वय ८५) यांना आहे. या बाबतीत अधिक आठवण नमूद करताना या वाड्यातील रजनी वसंत खेडेकर म्हणाल्या, की मी काँग्रेस कार्यकर्ता असल्याने मला शशी कपूर यांच्या उदारपणाची माहिती होते. शकुंतला बारणे यांना भेटण्यासाठी शशीजी स्वत: तीन वेळा आले. त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना ते अशा रुग्णांकडे पाठवीत असत. स्वत: दूध, औषधांसाठी खर्च करीत असत.वालचंदनगरमध्ये ‘कलियुग’चे चित्रीकरणइंदापूर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर सन १९८० -८१ मध्ये त्यांच्या 'कलियुग' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तालुक्यातील औद्योगिक नगरी असणाºया वालचंदनगर येथे आले होते. गडद रंगाच्या उंची सुटाबुटात समोर आलेल्या त्या वेळच्या या देखण्या, उंचपुºया व सडसडीत देहयष्टीच्या मात्र कमालीच्या ऊर्जावान अभिनेत्याची वालचंदनगरवासीयांवर पडलेली छाप आजही अमीट आहे.शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कँडल त्यांच्यासमवेत आल्या होत्या. वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या साखर कारखान्यात चित्रीकरण झाले होते. ते आटोपल्यानंतर तेथेच त्यांनी स्थानिक कामगारांशी आपुलकीने संवाद साधला होता. त्यांना पाहण्यासाठी आलेल्या जनसमुदायासदेखील त्यांनी नाराज केले नव्हते.साधारणत: दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विनोदनालयाच्या पटांगणात असणाºया विस्तीर्ण मंचावर येऊन त्यांनी वालचंदनगरकरांचे स्वागत स्वीकारलेच; त्याबरोबर रसिकांच्या पाठबळावर आपण यशस्वी झालो, असे सांगत चित्ररसिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांची मने जिंकली होती. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात वालचंदनगरमधील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अ‍ॅथलीट अर्जुन गायकवाड, कुस्तीपटू तथा उद्योजक उत्तम फडतरे व इतरांचा कपूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.