शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या झळा झाल्या तीव्र

By admin | Updated: May 11, 2017 04:09 IST

आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावरील

लोकमत न्यूज नेटवर्कडिंभे : आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्या-वस्त्यांवरील पाणीसाठे कोेरडे पडू लागल्याने मागील काही वर्षांच्या तुलनतेत या वर्षी पाणीटंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. दिवसागणिक वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माणसांबरोबरच पशु-पक्ष्यांचाही घोटभर पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. दिवस असो की रात्र डोक्यावर हंडे घेऊन बाया-बापड्यांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी अनवाणी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी रात्रीचा दिवस होऊ लागला असून पाणी टिपण्यासाठी आदिवासींचे झऱ्यांवर हेलपाटे सुरू झाले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाई वाढली आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तसतसे आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. विशेषकरून तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा यंदा सहन कराव्या लागत आहेत.या भागातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने माणसांबरोबरच जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पाणवठ्यांवर जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित झाले आहे. या पाण्यामुळे आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्नही अजून एक समस्या निर्माण झाली आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या, तसेच बॅक्टेरियामुळे आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आदिवासी भागातील पाटण खोऱ्यातील कुशिरे, महाळुंगे, दिगद, मेघोली, पिंपरी, व या गावच्या आदिवासी वाड्या-वस्त्या, तर आहुपे खोऱ्यातील बोरघर, घोटमाळ, वरसावणे, डोंगरावरील वाड्या-वस्त्या, तीरपाड, कोंढरे, पिंपरगणे, नानवडे, न्हावेड, भोईरवाडी या गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काळबांध, उगलेवाडी, गोहे गावच्या डोंगरमाथ्यावरील उपळवाडी, सायरखळा, उभेवाडी, गाडेकरवाडी तसेच पोखरीची बेंढारवाडी जांभोरीच्या गावच्या आदिवासी वाड्या-वस्त्या या भागात सध्या तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे.