शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 03:44 IST

शहरात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव शांततेत, पण उत्साहात साजरा होत आहे. गावातील अनेक मंदिरांतून घटस्थापना करण्यात आली असून, विविध सार्वजनिक मंडळेदेखील हा उत्सव साजरा

सासवड : शहरात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव शांततेत, पण उत्साहात साजरा होत आहे. गावातील अनेक मंदिरांतून घटस्थापना करण्यात आली असून, विविध सार्वजनिक मंडळेदेखील हा उत्सव साजरा करीत आहेत. येथील धान्य बाजारातील दत्त मंडळाचे हे ४४ वे वर्ष असून, नैमित्तिक महाआरती व अष्टमीला होम आदी कार्यक्रम असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष विनोद ओव्हाळ आणि महेश शिंदे यांनी सांगितले. २१ वे वर्ष असणाऱ्या बुरुड आळीतील शिवशक्ती मंडळही साध्या पद्धतीने हा सण साजरा करीत असल्याचे सिद्धार्थ साळुंखे यांनी सांगितले. आपले पहिलेच वर्ष असणाऱ्या खंडोबानगरातील मंडळाने तेथील महिलांना संधी देत हा सोहळा साजरा करीत असल्याचे विकास भांडवलकर यांनी सांगितले. माया महेश शितोळे, ललिता रमेश खोमणे, जया प्रवीण खोमणे, देवी धर्मा राठोड आदी महिला हा उत्सव साजरा करीत असून, मंडळाने अमरनाथ येथील प्रसिद्ध पिंडीचा देखावा उभा केला आहे. शहरातील इंदिरानगर आणि अशोकनगरात सुवर्ण अष्टविनायक मंडळ आपला उत्सव साधेपणाने साजरा करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अमन हिर्लेकर यांनी सांगितले. सासवडच्या पुरातन तुळजाभवानी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. प्रत्येक दिवशी नवरात्रीच्या दिवसाचे महत्त्व सांगणारे फलक लावण्यात येत असल्याचे मधुबाला श्याम महाजन यांनी सांगितले. विद्यमान नगरसेवक वामन जगताप अध्यक्ष असणाऱ्या संत सोपानदेव मंडळानेही सुंदर सजावट करून देवीची प्रतिष्ठापना केली असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. च्राजमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिलेच वर्ष साजरे करणाऱ्या गिरमे आळीतील मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवल्याचे अध्यक्ष मंदार गिरमे यांनी सांगितले. संगीत खुर्ची, महाराष्ट्राची लोकधारा, जागरण-गोंधळ, डान्स स्पर्धा, प्रा. नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, होममिनिस्टर आणि समाजातील मान्यवरांना पुरस्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे गिरमे यांनी सांगितले. च्सासवडच्या सोपाननगरातील ओम शिवशक्ती मंडळाने दर वर्षांप्रमाणेच साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. हिवरकर मळ्यातील टाकमाईमाता, कोंडीत नाक्यावरील तुळजाभवानी, लांडगे आळीतील तुकाईदेवी यांसह सर्वत्र उत्साहात हा सोहळा साजरा होत आहे.