शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय, विषमुक्त कृषी उत्पादन विक्रीसाठी शरद पवार यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:12 IST

बारामतीत ‘मोर्फा‘च्या पदाधिकाºयांनी घेतली भेट लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : राज्यात अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय व ...

बारामतीत ‘मोर्फा‘च्या पदाधिकाºयांनी

घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : राज्यात अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय व विषमुक्त उत्पादनांसाठी सुरुवात केली आहे. मात्र, या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी कृषी, सहकार व पणन विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या विकासात या तिन्ही विभागांची मदत घेऊन सेंद्रिय शेतीचे नवीन धोरण बनविण्याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

महा आॅरगॅनिक अ‍ॅन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) च्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पवार यांची त्यांच्या येथील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. सेंद्रिय व विषमुक्त तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण शेती अनेक शेतकरी राज्यात करीत आहेत. परंतु, त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही. ग्राहकांमध्ये अशा उत्पादनाबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे काम राज्य सरकारने करावे, अशी मागणी ‘मोर्फा’चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे, सुदाम इगंळे, माणिकराव झेंडे,जेजुरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, विश्वस्त शिवराज झगडे, अमरजित जगताप यांनी पवार यांच्याकडे केली आहे.

राज्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्याचे कृषी, सहकार व पणन मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर पुढील महिन्यात लवकरच बैठक घेणार आहेत. गोविंदबागेत पवार यांची सेंद्रिय व विषमुक्त शेतीबाबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राज्यात सेंद्रिय व विषमुक्त शेतीला मोठा वाव आहे .परंतु मार्केटिंगअभावी शेतकरी सेंद्रिय व विषमुक्त शेतीसाठी तयार होत नाहीत. म्हणूनच राज्य सरकारचे धोरण बनावे व सेंद्रिय, विषमुक्त शेतीमालाला किफायतशीर मार्केट मिळावे. याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने बनवून शेतकरी कंपन्यांना लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे मत ‘मोर्फा’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.