शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांना बळीचा बकरा करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

पुणे : “शरद पवार हे धोकेबाज नेते नाहीत. ते देशाचे नेते आहेत. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार पवार असतील‌ तर आमच्या शुभेच्छा ...

पुणे : “शरद पवार हे धोकेबाज नेते नाहीत. ते देशाचे नेते आहेत. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार पवार असतील‌ तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये,” असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

पुणे दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी शुक्रवारी (दि. १६) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, “ओबीसी समाजाची जनगणना आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्याने जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे हे नेमकेपणाने ठरविता येईल.” ओबीसींचा डेटा अंदाजे‌ तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार तो देत नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

आठवले म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळे सत्तास्थानी आलेल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये ताळमेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आमदार फुटतील या भीतीने पुढे ढकलण्यात येत आहेत. मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला देण्यासाठी संसदेने ठराव मंजूर करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. ईडी कारवाईशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.

चौकट

आरपीआय पुण्यात भाजपासोबतच

“पुणे महापालिकेची निवडणूक भाजपसोबत लढणार आहोत. पुन्हा आमचीच सत्ता येईल. भाजपामुळे रिपाइंला उपमहापौरपद मिळाले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढले‌ तर आम्ही त्यांच्यावर मात करू. पालिका निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढवणार असलो तरी विधानसभा निवडणूक आमच्या चिन्हावर लढविण्याचा प्रयत्न आहे.”

-रामदास आठवले, अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया