पुणे : ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ‘राज’ ठाकरे मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार होते. मात्र ही मुलाखत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार प्रारंभी हा कार्यक्रम ३ जानेवारीला होणार होता. मात्र त्यात बदल करून ६ जानेवारी रोजी बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स (बीएमसीसी) सायंकाळी ५ वाजता हा मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम पुढे ढकलल्याने पुणेकरांसह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. राज्यातील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत पुढे ढकलली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वत:च ही मुलाखत पुढे ढकलण्यास सांगितले. वातावरण थोडे निवळू दे, मग दोघांच्या सोयीने एखादी तारीख निश्चित करून या मुलाखतीचे आयोजन करता येईल, यासंबंधी आम्ही पवारसाहेबांशी चर्चा करू पुढची तारीख ठरवू, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी ‘लोकमत’ला दिली. कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत रद्द केली होती. संंमेलनाचा समारोपही आयोजकांना आटोपता घ्यावा लागला.
‘शोध मराठी मनाचा’तील शरद पवार-राज ठाकरे मुलाखत ढकलली पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:20 IST
‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ‘राज’ ठाकरे मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार होते. मात्र ही मुलाखत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
‘शोध मराठी मनाचा’तील शरद पवार-राज ठाकरे मुलाखत ढकलली पुढे
ठळक मुद्देराज्यातील अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुलाखत ढकलली पुढेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत केली होती रद्द