शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
5
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
6
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
7
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
8
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
9
कंबर, मान, खांद्यामध्ये असह्य वेदना; दुर्मिळ आजारामुळे १२ किलोने वाढला स्तनांचा आकार
10
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
11
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
12
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
13
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
14
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
15
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
16
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
17
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
18
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
19
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
20
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!

शेक्सपियर यांची जादू जगातील सर्व भाषांवर : थोरात

By admin | Updated: February 20, 2017 02:18 IST

शेक्सपियर यांनी आपल्या नाटकांतून प्रत्येक व्यक्तिरेखेचे जिवंत चित्रण केल्याने त्याची जादू जगातील सर्व भाषांवर आहे. इंग्रजी

लोणी काळभोर : शेक्सपियर यांनी आपल्या नाटकांतून प्रत्येक व्यक्तिरेखेचे जिवंत चित्रण केल्याने त्याची जादू जगातील सर्व भाषांवर आहे. इंग्रजी भाषेला त्यांनी नवीन शब्दांची देणगी दिली. तसेच चकाट्या पिटणे या संकल्पनेवर आधारित नाटकांची रचना केली. एकाकी जगणाऱ्याला सुरक्षितता वाटते, या संकल्पनेचा जगातील लेखक, विचारवंत, दिग्दर्शक, कवी आदींवर प्रभाव जाणवतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक थोरात यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी विभागाच्या वतीने ‘शेक्सपियर आणि समकालीन साहित्य’ या विषयांवर दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषद आयोजिण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषण करताना थोरात बोलत होते.या वेळी आपल्या मनोगतांतून त्यांनी युरोपीय देशांमध्ये आजही प्रत्येकाच्या दिवाणखान्यांतपवित्र बायबल आणी शेक्सपियर यांची नाटकांची पुस्तके संग्रही आहेत. ती धर्म आणी संस्कृतीची प्रतीके मानली जातात. संत तुकारामांनी मराठी भाषेला जे योगदान दिले, तसेच योगदान इंग्रजी भाषेला शेक्सपियर यांनी दिले.प्रास्ताविकांत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे यांनी शेक्सपियर आणि वंश, धर्म, सामाजिकता यासंदर्भात या परिषदेत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)