शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

तोडफोडीच्या राजकारणाचा श्रीगणेशा

By admin | Updated: September 14, 2016 00:43 IST

महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना विविध राजकीय पक्षांमध्ये तोडफोडीच्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत.

पिंपरी : महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना विविध राजकीय पक्षांमध्ये तोडफोडीच्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादीत तर राष्ट्रवादीतून भाजपात काँग्रेसमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ लागले आहेत. स्थानिक नेत्याकडून आपापले पक्ष बळकट करण्यासाठी बेरजेचे समीकरण जुळविले जात आहे.काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे व मुलगा आशिष गावडे यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार पडल्याचा दावा भाजपाने केला आहे. ‘पतीराज किंवा मुलगा भाजपात गेला असला, तरी मी काँग्रेसमध्येच आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका गावडे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, या बालेकिल्यास सुरुंग लावण्याचे काम भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुरू केले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नगरसेविकांचे पती, अनेक युवा नेते आणि कार्यकर्ते यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादीतील मोहरे फोडण्याचा प्रयत्न जगताप करू लागले आहे. नुकतेच भोसरीचे आमदार महेश लांडगे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आले. त्यांच्या या भेटीतून लवकरच भाजपात त्यांचा प्रवेश होणार याचे संकेत मिळाले. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीची खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दखल घ्यावी लागली. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर असताना पवार यांना शहरात पक्ष कार्यकर्ता मेळावा घ्यावा लागला. एवढेच नाही, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरसुद्धा गणेश मंडळांच्या आरतीला हजेरी लावण्याची वेळ आली. ज्या दिवशी पवार यांनी आवर्जून सांगवी, रहाटणी परिसरात गणेश मंडळांच्या आरतीला हजेरी लावली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी याच भागातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसमध्येही तोडफोड सुरू केली. रहाटणी, सांगवी परिसरात माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी आवर्जून हजेरी लावल्यानंतर उलट परिणाम जाणवला. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये दाखल झाला. तर आकुर्डी भागात पवार यांनी दिलेल्या भेटीत राष्ट्रवादीला अनुकुल परिणाम जाणवला. आकुर्डीतील शिवसेनेची एक नगरसेविका राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास तयार झाली. शिवसेनेतील काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे माजी महापौर आझम पानसरे यांच्या संपर्कात आहेत. (प्रतिनिधी)नगरसेविका जयश्री गावडे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, प्रभाग क्रमांक २४च्या काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आहेत. या भागातून त्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्या म्हणूनही गावडे यांची ओळख आहे. त्यांचे पती वसंत गावडे यांनी भाजपा प्रवेशानंतर नगरसेविकाही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. याबाबत नगरसेविका गावडे म्हणाल्या, ‘‘पती आणि मुलाने भाजपात प्रवेश केला असला, तरी मी अद्याप तरी काँग्रेसमध्येच आहे.’’