शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 10, 2017 01:47 IST

येथील कुरकुंभ-दौंड रस्त्यादरम्यान असणाऱ्या घाटात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आले आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : येथील कुरकुंभ-दौंड रस्त्यादरम्यान असणाऱ्या घाटात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आले आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्या हा खोडसाळपणा करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतजमिनी, माळरान, डोंगराळ भागातदेखील याचा परिणाम प्रभावीपणे दिसून येत आहे. कुरकुंभ घाटातील ज्या ठिकाणी हे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आले त्या ठिकाणीच कुरकुंभ येथे पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईनदेखील आहे. ती सध्या बंद आहे. कुरकुंभ गावातील सर्वच जमिनी या दूषित पाण्यामुळे खराब झाल्या असून, या कंपनीच्या मालकांनी आता माळरानावरदेखील याचा प्रयोग सुरु केलाय का? हा प्रश्न सध्या येथील रहिवाशांना पडला आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्यांचे व्यवस्थापन रासायनिक सांडपाण्याचा खर्च टाळण्यासाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीररीत्या रात्री-बेरात्री कुरकुंभ व परिसरात रासायनिक प्रक्रिया झालेले सांडपाणी गुपचुपपणे सोडून देऊन पर्यावरणाचा परिणामी येथील लोकवस्तीचा ऱ्हास करीत आहेत. रात्री उशिरा किंवा पहाटे वारंवार जागा बदलून वेगवेगळ्या ठिकाणी रासायनिक सांडपाणी सोडून देत असल्याची उदाहरणे या ठिकाणी घडत आहेत, तर सामान्य नागरिक व ग्रामस्थ याकडे फक्त बघण्याव्यतिरेक काहीच करत नाहीत.या पूर्वीही दौंड बारामती रोडवरील माळरानावर, औद्योगिक क्षेत्रामधील मोकळ्या जागेवर, कुरकुंभ घाटातील आश्रमशाळेच्या परिसरात, दौंड रस्त्यावरील गोळीबार मैदान परिसरात अशा प्रकारचे रासायनिक सांडपाणी सोडले जात होते. त्यामुळे आता जागा बदलून घाटाच्या खाईत तसेच खचखळगे असणाऱ्या ठिकाणी हे पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर अजूनपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. परिणामी हे कृत्य करणारी मंडळी अजून बिनधास्तपणे पाणी सोडून सर्वांच्याच डोळ्यांत धूळ झोकून आपले काम करीत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवता येईल का नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.