शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

धरण खोर्‍यात तीव्र टंचाई

By admin | Updated: May 22, 2014 05:49 IST

भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील भुतोडे, वेळंवड, नीरा-देवघर धरण खोर्‍यातील व महुडे भागातील २१ वाड्यावस्त्यांना, ९ गावांना ४ टँकर व ३ पिकअपद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

भोर : उन्हाचा तडाखा वाढल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढतेय. भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील भुतोडे, वेळंवड, नीरा-देवघर धरण खोर्‍यातील व महुडे भागातील २१ वाड्यावस्त्यांना, ९ गावांना ४ टँकर व ३ पिकअपद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाई वाढत आहे. दोन्ही धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील निवंगण धारांवे, कळवाचा माळ, पºहर बुद्रुक, धानवली, धनगरवस्ती, माझेरी, शिखली, हिर्‍या, कुडली बुद्रुक, चौधरीवस्ती, दुर्गाडी, अत्रेपुरी, मानटवस्ती, वारवंड, कारुंगण, सुईरमाळ, उबार्डेवाडी, उबार्डे, नेरडमाळ, महुडे बुद्रुक, भानुसदरा, आखाडेवस्ती, हरिजनवस्ती, गृहिणी, खुलशी, डेरे, भुतोडे, हुंबेवस्ती, जळकेवाडी, महादेववाडी, आंबेवाडी, सुतारवाडी, मिटकुटवाडी या गावांना, वाड्यावस्त्यांना ४ टँकर व ३ पीकअप जीपमधून पाणीपुरवठा दररोज एक खेप याप्रमाणे सुरू आहे. याशिवाय धारांबे, शिरगांव, शिळीव, आरिपी, कुंड, राजिवडी, साळुंगण या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वीच सादर केले आहेत. या गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे. शिरगाव व शिळीव गावांच्या नळपाणी पुरवठा विहिरींना पाणी कमी पडल्याने टंचाई आहे, तर कुंड आरिपीतील, उवार्डेमधील शिवकालीन विहिरीला पाणी नाही. त्यामुळे टंचाई जाणवत आहे. नीरा-देवघर धरणात २ टीएमसी (१७.६७ टक्के), भाटघर धरणात २ टीएमसी (८.४९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा-देवघर धरणाच्या गेटमधून १,६०० क्युसेक्सने, तर वीजनिर्मिती केंद्रातून ८,००० क्युसेक्सने, असे २,४०० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. (वार्ताहर)