शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तरण तलावात सात वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: June 2, 2017 19:32 IST

बोपाडी येथील जलतरण तलावात बुडून अरहान या सात वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ११.३० च्या सुसमारास घडली.

ऑनलाइन लोकमत
 
पिंपरी, दि. 02 - बोपाडी येथील जलतरण तलावात बुडून अरहान या सात वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ११.३० च्या सुसमारास घडली. त्या ठिकाणी नेमणूक केलेल्या जीवरक्षकाने निष्काळजीपणा दाखविल्याने ही दुर्घटना घडली. असा आरोप करून नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ बोपोडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शेख अस्लम शेख गुलाम दस्तगीर यांचा सात वर्षाचा मुलगा अरहान अन्य मुलांबरोबर जलतरण तलावावर गेला. त्याला पोहोता येत नव्हते.  दस्तगीर यांच्या भावाची मुले रिजवान व फैयाज यांच्याबरोबर अरहान गेला होता. जलतरण तलावावर गेल्यानंतर तेथील महिला रखवालदाराने रिजवान आणि फैयाज यांना पोहोण्यास सोडले नाही. अरहान छोटा असूनही त्याला एकट्याला सोडले. तो पाण्यात उतरला.पोहोता येत नसल्याने पाण्यात बुडाला.तेथील जीवरक्षकांनी तसेच व्यवस्थापकांनी लक्ष दिले नाही. अरहान काठेच दिसत नाही, हे लक्षात येताच रिजवान आणि फैयाज यांनी जलतरण तलावाच्या ठिकाणी असलेल्या रखवालदार, व अन्य कर्मचाºयांकडे विचारपूस केली. अरहान घरी गेला असावा, असे त्यांनी सांगितले. अरहान घरी गेला आहे का ? हे पाहण्यासाठी रिजवान तीन वेळा घरी गेला. तेथे कोठेही अरहान दिसून आला नाही. त्यानंतर निलोफर अस्लम शेख त्या ठिकाणी गेल्या. तेथे त्यांना अरहानची चप्पल दिसली. त्यांनी पाण्यात शोध घेण्यास सांगितले त्यावेळी अरहानचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर संतप्त झालेल्या अरहानच्या नातेवाईकांनी तेथील कर्मचाºयांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी केली. काही वेळात तेथे अन्य लोकही जमा झाले. अरहानला जवळच्या रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. अरहानच्या नातेवाइ्कांनी तजलतरण तलावावरील कर्मचा-यांनी निष्काळजीपणा दाखविल्यामुळे दुर्घटना घडली. असा आरोप करून त्यांच्याविरूद्ध फिर्याद दिली.