शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार किलो तांदूळ विक्री

By admin | Updated: February 5, 2016 02:18 IST

जिल्हातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा व हवेली तालुक्यांत सर्वाधिक उत्पादित होत असलेल्या तांदळासाठी सावित्री महोत्सवाद्वारे हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या

पुणे : जिल्हातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा व हवेली तालुक्यांत सर्वाधिक उत्पादित होत असलेल्या तांदळासाठी सावित्री महोत्सवाद्वारे हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या पहिल्याच प्रयोग यशस्वी झाला. तीन दिवसांत सात हजार किलो तांदळाची विक्री झाली. आंबेमोहर व हातसडीच्या तांदळाला मागणी होती.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेने ही बाजारपेठ उपलब्ध करून दिली होती. जिल्ह्यातील सह्याद्रीपट्ट्यात सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेतले जाते. डोंगरी भागातील शेतकरी व महिला बचत गट मोठ्या प्रमाणावर बासमती, आंबेमोहोर, कोलम, इंद्रायणी, कोळना, जिर, रायभोग, खडक्या, चिनौर, जयश्रीराम, केशर इ. जातीच्या तांदळाचे उत्पादन करतात. परंतु त्यांनी उत्पादित केलेल्या तांदळाला बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नाही. हातसडीच्या तांदळाला मागणी असूनही ग्राहकांना तो उपलब्ध होत नाही. यामुळे ‘सावित्री तांदूळ महोत्सव २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते. २ ते ४ फेब्रुवारी असे तीन दिवस हा महोत्सव जिल्हा परिषदेच्या आवारात झाला. ८ तालुक्यांमधून २२ स्वयंसाह्यता गटांनी उत्पादित केलेला तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. सुमारे ७००० किलो इतक्या तांदळाची विक्री झाली व या विक्रीतून महिलांना सुमारे ३,५०,००० रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. तांदूळ खरेदीसाठी शासकीय कर्मचारी, तसेच पुण्यातील नागरिकांनी तांदूळ खरेदीसाठी गर्दी केली होती.ग्रामीण विकास यंत्रणेने हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून महिला बचत गटांच्या सदस्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या कामाला बाजारपेठ उपलब्धतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. सुमंत पांडे व सहायक प्रकल्प अधिकारी (महिला) सपना करकंड यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)