शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सातबाऱ्यावर नाव; ताबा नाही

By admin | Updated: March 26, 2016 02:58 IST

धरणे बांधण्यासाठी जमिनी देऊन बेघर झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने हवेली तालुक्यात जमिनीचे वाटप करून पुनर्वसन केले. या जमिनीचा सातबारा प्रकल्पग्रस्तांच्या नावावर झाला

पुुणे: धरणे बांधण्यासाठी जमिनी देऊन बेघर झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने हवेली तालुक्यात जमिनीचे वाटप करून पुनर्वसन केले. या जमिनीचा सातबारा प्रकल्पग्रस्तांच्या नावावर झाला देखील, पण गेली दहा-पंधरा वर्षे झाली, ही जमीन अद्याप प्रकल्पग्रस्तांना ताब्यात मिळालेली नाही. अशी सर्व जमीन शासनाने ताब्यात घ्यावी, असा प्रस्ताव हवेली प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी तयार केला आहे.पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हवेली तालुक्यात थेऊर, उरुळीकांचन, हडपसर, लोणीकाळभोर, नांदेड, वडगाव बु., मांजरी बु., नायगाव, सोरतापवाडी, फुरसंगु आदी गावांमध्ये शासनाने पुनर्वसन करून येथील जमीन दिली. परंतु, गेल्या काही वर्षांत हवेली तालुक्यातील जमिनीचे भाव गगणाला भिडल्याने सातबारा प्रकल्पग्रस्तांच्या नावावर झाला, तरी मूळ मालकांनी जमिनीचा ताबा सोडण्यास नकार दिला. यामध्ये कोर्ट-कचेऱ्या करून देखील अनेक प्रकल्पग्रस्तांना आपली जमीन ताब्यात मिळालेली नाही.हवेली प्रांत अधिकारी स्नेहल बर्गे यांनी हवेल तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीचे नवीन शर्त शेरा कमी करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये हवेली तालुक्यात पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांची संख्या २३७ इतकी आहे. यामध्ये जमिनीचे वाटप करून दहा वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पगस्तांच्या सातबा-यावरील नवीन शर्त शेरा कमी करण्यात येतो. त्यानुसार १५४ प्रकल्पग्रस्तांच्य सातबा-यावरील नवीन शर्त शेरा कमी करण्यात आला आहे. यामध्ये ८३ प्रकल्पग्रस्तांच्या सातबा-यावरील शेरे कमी करणे अद्याप बाकी आहे. परंतु यामध्ये सातबारा जरी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर झाला असला तरी जमीन मात्र मुळ मालकांच्याच ताब्यात असल्याचे समोर आले आहे.