शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

लोणावळ्यात आजपासून बंदोबस्त

By admin | Updated: August 13, 2016 05:13 IST

स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या शनिवार व रविवार या तीन दिवसांच्या सलग सुटीमुळे लोणावळ्यात पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन लोणावळा व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

लोणावळा : स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या शनिवार व रविवार या तीन दिवसांच्या सलग सुटीमुळे लोणावळ्यात पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन लोणावळा व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सोयीसाठी तीन दिवस सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक व्यवस्था तसेच कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शनिवार ( दि. १३) ते बुधवार (दि. १७) दरम्यान तब्बल २० अधिकारी व २२५ पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे आणि लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे शनिवार व रविवार लोणावळा व परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात आली होती. सध्या शहरात पावसाचा जोर कमी झाला असल्याने सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली असणार असून, पर्यटकांनी मद्यपान करून हुल्लडबाजी व बेशिस्तपणा न करता लोणावळ्यातील पर्यटनाचा आनंद घ्यावा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासन व लोणावळेकर नागरिकांनी केले आहे.तीन दिवस सलग सुटी व मागील आठवड्यात राज्यभरातील बहुतांश पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची तोबा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मध्य रेल्वेच्या वतीने शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांत सहा स्पेशल ट्रेन मुंबई-पुणेदरम्यान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. द्रुतगती मार्गावरील व लोणावळा शहरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यटकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. पर्यटनस्थळावरील धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.शनिवार ते सोमवार लोणावळ्यात सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, शहर व्यापाऱ्यांनीही हे तीन दिवस मालांचे अवजड ट्रक शहरात मागवू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे लोणावळ्यामध्ये वाहतुककोंडी किंवा पर्यटकांना त्रास होणाऱ्या घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)हुल्लडबाजांवर कडक कारवाई लोणावळ्यात पर्यटकांचे लोणावळेकर नागरिक व पोलीस प्रशासनाकडून स्वागतच आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मद्यपान करून हुल्लडबाजी करणे, महिलांची छेडछाड, रस्त्यावर आरडाओरडा करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, असे प्रकार करणाऱ्या हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे. याकरिता मोठ्या संख्येने ब्रिथ अ‍ॅनालायझर मशिन मागविण्यात आल्या असून, मुख्य चौक व चेक नाक्यावर ही तपासणी करण्यात येणार आहे.भुशी धरणाकडील मार्ग होणार बंदभुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणारा मार्ग मुख्य चौकात दुपारी तीन वाजता बंद करण्यात येणार असून, सायंकाळी पाचनंतर धरण व डोंगरात उंच जाणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्यात येणार आहे. धरण परिसरात वाहने सोडण्याच्या वेळामध्ये पर्यटकांची संख्या व वाहतूककोंडीचे प्रमाण या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेत बदल करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले. शनिवार ते सोमवार लोणावळ्यात सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, कोणीही शहरात अवजड वाहने बस, मिनी बस, टेम्पो अथवा ट्रक आणू नयेत.