शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत पर्जन्यमापक बसविणार

By admin | Updated: May 28, 2016 04:18 IST

सध्या जिल्हात मंडलावर आधारित पाऊस मोजला जातो. त्यामुळे आणेवारीत फरक पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावांत पर्जन्यमापक यंत्रणा

पुणे : सध्या जिल्हात मंडलावर आधारित पाऊस मोजला जातो. त्यामुळे आणेवारीत फरक पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावांत पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याच्या विचारात आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. हवेली तालुका खरीप हंगाम टंचाई बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेत शरदचंद्र सभागृहात गुरुवारी ही बैैठक झाली. सध्या काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. आणेवारीवर आधारित शासन ती जाहीर करते. आणेवारी त्या गावात पाऊसमान किती झाला यावर ठरविली जाते. मात्र, जिल्ह्यात पाऊस मोजण्याची यंत्रणा सक्षम नाही. मंडलावर असलेल्या यंत्रणेतून पाऊस गृहीत धरला जातो. त्यामुळे काही गावांत कमी पाऊस पडला व जिथे यंत्रणा आहे तेथे जास्त पाऊस पडला, तर हाच पाऊस त्या गावाला लागू होतो. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद प्रत्येक गावात पर्जन्यमापक बसविण्याच्या विचारात आहे. पुरवणी बजेटच्या अगोदर जर यासाठी किती निधी लागू शकतो हे समजले तर निधी ठेवता येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याचे इस्टिमेट तयार करावे, असे आवाहन कंद यांनी या वेळी केले. या बैैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई, महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुनील खैरनार, हवेली पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)हवेली तालुक्यात १ लाख वृक्षलागवड करणारयंदा शासनाने २ कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात १ लाखापेक्षा अधिक वृक्षलागवड करून जिल्ह्यात आमचा तालुका पहिल्या क्रमांकावर राहील, असे आश्वासन या वेळी कंद यांनी हवेलीकरांच्या वतीने दिले. त्यांनी उपस्थितांना आवाहन करीत तालुक्यात सर्वाधिक वृक्ष लागले पाहिजेत, एकही सरकारी जागा शिल्लक राहता कामा नये, ग्रामसेवकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे सांगितले. आता रब्बी हंगामापूर्वीच कृषी मेळावेदरवर्षी जिल्ह्यात मार्चअखेर कृषी मेळावे घेतले जातात. मात्र आता रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी तेही प्रत्येक तालुक्यात कृषी मेळावे घेतले जातील. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाईल, असेही कंद यांनी सांगितले. पावतीचा आग्रह धराबी बियाणे, खते दुकानातून घेताना शेतकऱ्यांनी पावतीचा आग्रह धरावा. पुढे बियाणांची तक्रार होते, तेव्हा पावती गरजेची असते, असे कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी आवाहन केले. दुकानदारांनी हलगर्जीपणा करू नये, तसे आढळल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असेही त्यांनी सांगितले.