शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘सेट-नेट’ला पर्याय गुणवत्तेला अडसर

By admin | Updated: May 12, 2017 05:38 IST

महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता असलेल्या सेट/नेटच्या पदवीला पीएच.डी.चा पर्याय उपलब्ध करून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता असलेल्या सेट/नेटच्या पदवीला पीएच.डी.चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याने पीएच.डी. संशोधनाचा दर्जा घसरला असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाकडून (यूजीसी) सेट/नेट परीक्षेला २००९मध्ये हा निर्णय झाल्यावर अचानक पीएच.डी.साठी रजिस्ट्रेशन करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. अभिमत, खासगी, मुक्त विद्यापीठांमध्ये पीएच.डी.च्या प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागली. त्यातून कॉपी पेस्ट संशोधनामध्ये अचानक मोठी वाढ झाली. गाइड व विद्यार्थी यांच्या संगनमताने दर्जाहीन संशोधनांना पीएच.डी.च्या डिग्री बहाल करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. माजी अधिसभा सदस्य अतुल बागुल यांनी याबाबत सांगितले, ‘‘सेट/नेट परीक्षेला पीएच.डी.चा पर्याय केल्यामुळे संशोधनाचा फुगवटा तयार झाला आहे. पीएच.डी.ची नियमावली कडक करण्यात आली आहे; मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही. प्राध्यापकांनी पीएच.डी.ची डिग्री घेतल्यानंतर, पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन करणे अपेक्षित असते; मात्र एकदा पीएच.डी.ची डिग्री हातात पडली की, पुन्हा ते संशोधनाच्या वाट्याला जात नाहीत. पीएच.डी. संशोधनाबाबत अनेकदा गाइड आणि विद्यार्थी यांच्या कडून सार्वजनिक अप्रामाणिकपणा केला जात असल्याचे दिसून येतो.’’यूजीसीकडून पीएच.डी. प्रवेश व इतर नियमावलीमध्ये फेरबदल करून पीएच.डी.चा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न केले; मात्र या नियमांनाही अनेक पळवाटा विद्यापीठ पातळीवर शोधण्यात आल्याचे दिसून येत आहे.