शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाने सादर केले अर्धवट अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 03:17 IST

शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती; मात्र

पुणे : शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती; मात्र मुख्यसभेसमोर अधर्वट कागदपत्रे सादर करण्यात आल्याने मुख्यसभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली. स्थायी समितीने शिक्षण मंडळाच्या मागील वर्षीच्या तुलनेत ५५ कोटी रुपयांनी वाढीव असलेल्या ३४१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. या अंदाजपत्रकाला ३१ डिसेंबरच्या आत मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने मंगळवारी याकरिता विशेष सभा आयोजित करण्यात आली. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे सभासद सुधीर जानजोत यांनी सभा चालविण्यासाठी सभागृहात पुरेशी गणसंख्या उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बराच वेळ सभागृहाचे कामकाज खोळंबून राहिले. त्यानंतर उशिराने काही सभासद आल्यानंतर सभेचे कामकाज झाले.जमेची बाजूच नाहीशिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक सादर करताना जमा बाजूच दाखविली नसल्याचे मनसेचे सभासद बाळा शेडगे यांनी सांगितले. त्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहिफळे त्याबाबतची माहिती देत असताना मुख्यसभेला स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची कागदपत्रेच देण्यात आली नसल्याचे निर्दशनास आले. कागदपत्रे जोडायचे चुकून राहिले असल्याची कबुली दहिफळे यांनी दिली. यावर काँग्रेसच्या सुनंदा गडाळे, कमल व्यवहारे यांनी जोरदार आक्षेप घेतला. अंदाजपत्रकाची संपूर्ण कागदपत्रे सादर करा त्यानंतरच यावर चर्चा करू, अशी भूमिका सभासदांनी घेतली. अखेर सभागृहनेते बंडू केमसे यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मुख्यसभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली.