शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वीजबचतीसाठी स्वच्छतागृहात सेन्सर

By admin | Updated: April 30, 2017 05:13 IST

महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सर्व स्वच्छतागृहांमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत. यापुढे आत कोणी व्यक्ती असेल तरच आतील दिवे लागतील, अन्यथा ते

पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सर्व स्वच्छतागृहांमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत. यापुढे आत कोणी व्यक्ती असेल तरच आतील दिवे लागतील, अन्यथा ते आपोआप बंद होतील. यातून महापालिकेची सुमारे २० टक्के वीज बचत होणार आहे.महापालिकेच्या विद्युत विभागाने हे सेन्सर सध्या प्रायोगिक तत्त्वावर बसवले आहेत. महापालिका मुख्य व विस्तारित इमारतीच्या तळमजल्यापासून सर्व मजल्यांवर स्त्री व पुरुषांसाठी अशी सुमारे २० स्वच्छतागृहे आहेत. त्यातील दिवे आत कोणीही नसले तरीसुद्धा सुरूच राहतात, अनेकदा दिवे बंद करायचे विसरले जाऊन ते रात्रभर सुरूच राहतात, असे विद्युत विभागाच्या पाहणीत आढळले. त्यामुळे महापालिकेच्या वीजबिलात बरीच वाढ होते, असेही निदर्शनास आले.त्यावर उपाय म्हणून विद्युत विभागाने हे सेन्सर बसवले आहेत. आतील बाजूस ह्यूमन बॉडी असेल तरच दिवे सुरू राहतील. स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला की, बंद असलेले आतील दिवे लागतील. जोपर्यंत स्वच्छतागृहात आत कोणीतरी आहे, तोपर्यंत ते सुरू राहतील. आत कोणीच नसेल, अशा वेळी सर्व दिवे आपोआप बंद होतील. यातून वीज बचतीस मदत होणार आहे.(प्रतिनिधी) प्रायोगिक प्रकल्पसध्या प्रायोगिक स्तरावर महापालिकेनेच हे सेन्सर बसवले आहेत, अशी माहिती विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता श्रीकृष्ण चौधरी यांनी दिली. त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या मालकीच्या शहरातील सर्वच इमारतींमधील स्वच्छतागृहांत असे सेन्सर बसवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे महापालिकेची सुमारे २० टक्के वीजबचत होईल, असेही ते म्हणाले.