शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रसिलाच्या खुनात वरिष्ठांचा सहभाग

By admin | Updated: February 1, 2017 05:22 IST

हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता असलेल्या रसिला राजू ओपी (वय २३, मूळची रा. केरळ) हिच्या खुनात कंपनीतील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा

पिंपरी : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता असलेल्या रसिला राजू ओपी (वय २३, मूळची रा. केरळ) हिच्या खुनात कंपनीतील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असू शकतो, असा आरोप रसिलाच्या नातेवाइकांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केरळ काँग्रेसने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कामावर आलेल्या रसिलाचा वॉचमनने केबलने गळा आवळून खून केला. या घटनेनंतर केरळहून पुण्यात आलेल्या तिचे वडील व काकांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. रसिलाने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाच होत असल्याची तक्रार करून बदलीचीही मागणी केली होती. मात्र त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे यात केवळ वॉचमनच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असू शकतो, त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली. कंपनीने एक कोटी रुपये मदत देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे. कंपनीकडून त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले, भरपाई देण्याचा मुद्दा कंपनीच्या अखत्यारितील आहे. आमच्याकडे अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. कंपनीतर्फे देण्यात येणारी देय रक्कम, विमा मिळून भरपाई त्यांना मिळू शकेल. आरोपी भाबेन भराली सैकिया (वय २६, मूळ रा. आसाम) याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)‘सखोल चौकशी करावी’थिरुअनंतपुरम : केरळचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सखोल चौकशीची मागणी केली. ‘रसिलाच्या हत्येचे काहीतरी गूढ असून, इतर काहींचा यात हात होता, असे नातेवाइकांनी मला सांगितले. कंपनीचीही मोठी चूक आहे, अशी तक्रार त्यांनी केली.