शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम तपासणीसाठी सीएफएसएलकडे पाठवा

By admin | Updated: May 8, 2017 03:10 IST

पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) तपासणीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) तपासणीसाठी हैदराबाद येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (सीएफएसएल) १५ मेपूर्वी पाठवावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले असून यानंतर तपासणीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याबाबत काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर हा आदेश देण्यात आला आहे. छाजेड यांनी भाजपाच्या उमेदवार माधुरी मिसाळ, पर्वती विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक आयोग यांना प्रतिवादी केले आहे. शुक्रवारी न्यायालयाने या निवडणूक याचिकेवर हा निर्णय दिला.छाजेड यांना मतदान करणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी प्रतिज्ञापत्र दिले होते. अशा मतदारांनी १८५ आणि २४२ या क्रमांकाच्या २ बूथमध्ये केलेल्या मतदानापेक्षा छाजेड यांना कमी मतदान मिळाले आहे. अशा ६३ मतदारांची तपासणी न्यायालयाने केली. त्या वेळी ५२ मते छाजेड यांना मिळत असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात यंत्रामध्ये मतदान कमी दिसत असल्याचा छाजेड यांचा संशय आहे. छाजेड यांच्या वतीने त्यांचे वकील विश्वजित सावंत काम पाहत आहेत. छाजेड यांनी सांगितले, की देशात प्रथमच निवडणूक याचिकेवर अशा प्रकारचा निर्णय प्रथमच होत आहे. ‘सीएफएसएल’ला कोणतीही तांत्रिक माहिती हवी असल्यास ती देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.