शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांची चढ्या दराने विक्री

By admin | Updated: June 3, 2017 02:47 IST

सात बारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमालाला योग्य हमी भाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंदननगर : सात बारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमालाला योग्य हमी भाव द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अशा एकूण सात मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. यामुळे वडगावशेरी, चंदननगरमधील भाजीमंडई ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले.यामुळे चंदननगर छत्रपती शिवाजीमहाराज मंडई व वडगावशेरी गावठाण येथील दोन्ही मंडई ओस पडल्या आहेत. याचबरोबर वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर भागातील नागरिकांना काद्यांपासून ते विविध प्रकारच्या भाज्या व फळभाज्या बाजारातून जादा दराने खरेदी कराव्या लागत आहे.राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या मागण्याचे गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि अखेर राज्यातील बळीराजाने बेमुदत कालावधीसाठी सुटी घेत शहराची रसद रोखली.चंदननगर व वडगावशेरीतील भाजीमंडईत गुरुवारी रात्री एकाही शेतकऱ्याने शेतमाल बाजारात न आणल्यामुळे बाजारांचा व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बाजारात कुठल्याही प्रकाराचा भाजीपाला उपलब्ध झाला नाही.दोन्ही बाजारातील व्यापारी व किरकोळ भाजी विक्रेत्यांनी संपाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची साठवणूक केल्याने त्यावरच चंदननगर व वडगावशेरीतील भाजीमंडई चालू होत्या. त्यात एकाही शेतकऱ्याचा सहभाग नसल्याने बाजारात भाजीपाला न आल्याने बाजार ओस पडला होता.बाजारात गाड्या पोहचू दिल्या नाहीत चंदननगर बाजारात नगर रोडमार्गे येणाऱ्या शेतमालाच्या गाड्या कोरेगाव व वाघोलीतच शेतकऱ्यांनी अडविल्यामुळे त्या चंदननगर व वडगावशेरीतील बाजारात आल्याच नाही. त्यामुळे ग्राहकांची भाजी खरेदीसाठी वणवण झाली. नागरिकांची लूटसध्या दोन्ही बाजारांत दोन दिवसांपुरता भाजीपाला उपलब्ध आहे. मात्र शेतकऱ्यांचा संप लवकर मिटण्याची शक्यता कमी असल्याने सामन्यांची मोठी लूट होणार आहे. वाटेल त्या दराने भाज्यांची विक्री व्यापारी करू लागले आहेत. यापारी जेवढे पैसे महिनाभरात कमवितात, तेवढेच पैसे या संपाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकडून कमवित असल्याचे नागरिकांचे मत आहे. सूर्योदय होताच उपनगरामधील गल्लीबोळात भाजीवाला; दुधवाल्याची आरोळी ऐकू येते; मात्र शुक्रवारी सकाळी उजाडल्यानंतर उपनगरात बहुतांश भागात हे दोन्ही घटक फिरकलेच नाहीत.