शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीवर शिक्षकांचा बहिष्कार

By admin | Updated: January 10, 2017 02:32 IST

शालेय शिक्षण विभागाच्या ४ नोव्हेंबरच्या परिपत्रकामध्ये दरप्र सोमवारी शिक्षकांनी १० विद्यार्थ्यांचा गट करून सेल्फी काढून ‘सरल प्रणाली’त तो अपडेट करायचा आहे

मंचर : शालेय शिक्षण विभागाच्या ४ नोव्हेंबरच्या परिपत्रकामध्ये दरप्र सोमवारी शिक्षकांनी १० विद्यार्थ्यांचा गट करून सेल्फी काढून ‘सरल प्रणाली’त तो अपडेट करायचा आहे. या प्रक्रियेला सोमवारी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाने विरोध केला आहे, अशी माहिती अध्यक्ष विजय घिसे व सरचिटणीस सुनील भेके यांनी सांगितले. सेल्फीवर बहिष्काराचे निवेदन गटविकास अधिकारी राहुल काळभोर, विस्तार अधिकारी रामदास पाल्ोकर यांना तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले.राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ४ नोव्हेंबरला काढलेल्या परिपत्रकात विद्यार्थ्यांची गळती व गैरहजेरी कमी करण्याचे कारण दाखवून दर सोमवारी वर्गशिक्षकाने १० विद्यार्थ्यांचा गट तयार करून त्यांचा स्वत:सोबत सेल्फी घ्यावा व तो ‘सरल प्रणाली’त आॅनलाईन अपडेट करावा, असे आदेश दिले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाविरोधात भूमिका घेऊन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन गळती गैरहजेरी व सेल्फीचा संबंध येत नाही. या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार असून, त्याबाबत अनेक बाबी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सेल्फीबरोबरच वर्गशिक्षकांनी दैनंदिन हजेरी आॅनलाईन सरल प्रणालीत भरण्याची सक्ती शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ही माहिती आंबेगाव तालुक्यातील शाळेतूनच भरावी लागणार आहे; परंतु आंबेगाव तालुक्यातील बहुतांश शाळा दुर्गम आदिवासी डोंगराळ भागात असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना ही माहिती सरल प्रणालीत अपडेट करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (वार्ताहर)मोठ्या पटसंख्येच्या शाळांना फटकायापूर्वी शालेय पोषण आहार योजनेसाठी एमडीएम अ‍ॅपद्वारे विद्यार्थी दैनंदिन हजेरी आॅनलाईन भरण्याचे काम शिक्षक करीत असताना पुन्हा उपस्थिती अ‍ॅपमध्ये दैनंदिन हजेरी भरण्याची सक्ती शासनाकडून केली जात आहे. हा प्रश्न अनुत्तरितच आहे. विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून सरल प्रणालीवर अपलोड करण्याचा आदेश म्हणजे शिक्षकांवरील अविश्वास आहे. हा प्रकार फारच त्रासदायक व मानहानिकारक असून, १० ते २० पटसंख्येच्या शाळा नजरेसमोर ठेवून हा आदेश काढला असला, तरी मोठ्या पटसंख्येच्या शाळा यात भरडून निघणार आहेत.शिक्षकांवर याअगोदरच शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्त्या, सरल प्रणाली या कामांचा ताण असून इंटरनेट सुविधा, मोबाईल रेंज, विजेची उलब्धता इ. समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सेल्फीवर बहिष्काराचे निवेदन गटविकास अधिकारी राहुल काळभोर, विस्तार अधिकारी रामदास पाल्ोकर यांना तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले.