शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गोळी झाडून सुरक्षारक्षकाची आत्महत्या

By admin | Updated: April 1, 2017 00:02 IST

वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून

वाघोली : वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून एकाने स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना वाघोली येथे गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.दुसऱ्या सुरक्षारक्षकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेूँ्न;. तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी सुरक्षारक्षकाच्याच बंदुकीतून गोळीबार करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती.कृष्णा देविदास जाधव (वय ३२, रा. आपले घर, मूळ पिंपळगाव काजळे, परभणी) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर गजानन मगर (वय ४०, मूळ पिंपळगाव, परभणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील साईसत्यम गोदाम परिसरामध्ये असणाऱ्या एसएसकेए कंपनीचे गोदाम आहे. रात्री आणि दिवसा गोदामाच्या सुरक्षेसाठी वेक्टा सिक्युरीटीतर्फे या ठिकाणी बंदुकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊनंतर बंदूकधारी सुरक्षारक्षक कृष्णा जाधव व गजानन मगर यांच्यामध्ये वरिष्ठांकडे केलेली तक्रार तसेच ड्युटी करण्याच्या कारणावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. जाधव यांनी यावेळी बंदूक स्वत:वर रोखून आत्महत्या करण्याची देखील धमकी दिली होती. गोदामातील इतर कामगार आणि सुरक्षारक्षकांनी जाधव याच्याकडील बंदूक हिसकावून घेऊन दोघांची भांडणे मिटविली. वादावादी शांत करण्यात आल्यानंतर मगर त्या ठिकाणाहून निघाले आणि जाधव यांना बंदूक पुन्हा देऊन इतर कामगार परतले. हा सर्व प्रकार गोदामातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कामगार जात असतानाच गोदामाच्या मुख्य रस्त्यावर जाधव याने त्याच्याकडे असणाऱ्या बोअर ३२च्या बंदुकीतून स्वत:च्या डोक्यामध्ये गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोदाम परिसरात असणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांसमोर आत्महत्येचा प्रकार घडला. इतर सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती कळविली. लोणी कंद पोलिसांना घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली. यानुसार जाधव यांनी स्वत:हून रागाच्या भरात आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपअधिक्षक वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनेच्या तपास केला. (वार्ताहर)