शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शारदाबाई पवार महाविद्यालयाची ‘डीबीटी स्टार’ योजनेंतर्गत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

देशातील मोजक्याच महाविद्यालयांना सदर योजनेकरिता निवडले जाते. या महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र व वनस्पतिशास्त्र या विभागांना सदर योजनेकरिता निवडले गेले ...

देशातील मोजक्याच महाविद्यालयांना सदर योजनेकरिता निवडले जाते. या महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र व वनस्पतिशास्त्र या विभागांना सदर योजनेकरिता निवडले गेले आहे. या योजनेअंतर्गत महाविद्यालयाला ४५ ते ५० लाख इतके अनुदान प्राप्त होणार असून महाविद्यालयातील सदर विभागातील पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे.

‘डीबीटी स्टार कॉलेज’ योजनेकरिता निवड झाल्याने महाविद्यालयातील विभागाचे उपकरणीय दृष्टिकोनातून सबलीकरण होणार आहे. त्याचा प्रत्यक्ष फायदा हा विद्यार्थिनींना नवनवीन प्रयोग व संशोधन आधारित प्रकल्प राबविण्याकरिता होणार आहे. पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींकरिता, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, विविध चर्चासत्रे, परिषदा, प्रशिक्षणे आयोजन करण्याकरिता किंवा भाग घेण्याकरिता सदर योजनेचा उपयोग केला जातो, अशी माहिती योजनेचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी दिली. शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र व वनस्पतिशास्त्र या तीनही विभागांतील अध्यापक व विद्यार्थी संशोधनामध्ये अग्रेसर भूमिका बजावत आहेत. मातृसंस्था अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेतीजन्य विकासावर संशोधन करीत आहेत. आजपर्यंत या विभागातील विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी ६० पुस्तके आणि ५८५ संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स-नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. संस्थेकडे उत्कृष्ट पायाभूत व वैज्ञानिक सुविधा असल्यामुळे संशोधनास विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रयोगशाळेसारखी सुविधा बारामतीमध्ये मिळू लागली आहे.