शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

भूगावात मिलमधून २० टन धान्य जप्त

By admin | Updated: October 2, 2015 00:46 IST

अन्नधान्य पुरवठा खात्याने भूगाव येथील मिलवर छापा घालून स्वस्त धान्य दुकानात पाठविलेले वितरणाचे २० टन धान्य जप्त केले़ या मिलवर कारवाई करून तिला सील करण्यात आले आहे़

पुणे : अन्नधान्य पुरवठा खात्याने भूगाव येथील मिलवर छापा घालून स्वस्त धान्य दुकानात पाठविलेले वितरणाचे २० टन धान्य जप्त केले़ या मिलवर कारवाई करून तिला सील करण्यात आले आहे़ त्यात चार टेंपो, ८ टन गहू आणि १२ टन तांदळाचा समावेश आहे़ भूगाव परिसरात कोणतीही परवानगी नसताना एक आटा मिल असून येथे शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येत असल्याचा धान्याचा साठा उचल करीत असल्याची माहिती मिळाली होती़ भीमशाही संघटनेचे शहराध्यक्ष राम पालवे यांनी त्याची पाहणी केली़ दुपारच्या वेळी काही टेंपो आणि महिंद्रा पिकअप व्हॅनमधून मोठ्या प्रमाणावर धान्य येथे आणले जात असल्याचे त्यांना दिसून आले़ त्यांनी काही दिवस येथे लक्ष ठेवले़ आज खडकी येथील स्वस्त धान्य दुकानातून दुपारी तीन टेंपोमधून गहू भरुन तो या मिलवर आणण्यात आला़ या टेंपोंच्या पाळतीवर पालवे होते़ त्यांनी याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांना दिली़ कदम व त्यांचे सहकारी संजीव साखरे, अनिल टेमक, संतोष शेळके यांनी पौड पोलिसांच्या मदतीने या मिलवर छापा घातला़ त्यात गव्हाबरोबरच तांदळाचीही पोती या मिलमध्ये असल्याचे आढळून आले़ पौड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक फौजदार रमेश वाघवले, हवालदार ए़ ए़ शेख, ए़ व्ही़ बनसोडे, एस़ ए़ मुळे, व्ही़ व्ही़ चौबे यांनी या कारवाईत भाग घेतला़ भूगावमधील या मिलचे मालक चौधरी असून, येथे शहरातील विविध भागातील स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ आणून त्यांचे पीठ करण्यात येते़ हे पीठ पॅकिंग करून बावर्ची या नावाने बाजारात विकण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे़ पौड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, वाहनचालक चंद्रकांत सदाशिव बामणे (वय ४०) आणि बबनराव राहू कोकरे (वय ३५) यांना ताब्यात घेण्यात आले आहे़