शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैभवशाली इतिहास होणार नजरेआड

By admin | Updated: December 31, 2014 00:28 IST

सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे.

पुणे : पुनवडी ते पुणे, पेठा कशा वसल्या, शनिवार वाड्यावर युनियन जॅक कसा फडकला, पोस्ट आॅफिस सुरू, पानिपत युद्धानंतर सैनिकांसाठी बांधण्यात आलेला लाकडी पूल, पूर्वी कात्रज तलावापासून शनिवार वाड्यापर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा कसा होत असे, अशा पद्धतीने सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे. आज (बुधवारी) हे प्रदर्शन संस्थेकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. बारा वर्षांपूर्वी निनाद संस्थेचे उदय जोशी यांच्याकडे पुण्याची ओळख सांगणाऱ्या या प्रदर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु हा एका तपाचा करार गेल्या वर्षी पूर्ण होऊनदेखील पालिकेने हे प्रदर्शन ताब्यात घेण्याचे किंवा कराराची मुदत वाढविण्यासंबंधीही अद्याप कोणतीच पावले उचलली नाहीत. तरीही पुण्याचे हे वैभव पर्यटकांना पाहता यावे या विचाराने जोशी यांनी पालिकेकडून काहीही अपेक्षा न बाळगता हे प्रदर्शन खुले ठेवले, ते केवळ पुणेकरांसाठी.शहराच्या पर्यटनविषयक उपक्रमात विश्रामबाग वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूला स्थान देण्यात आलेले नाही. ही त्यातील अजून दुर्दैवी बाब आहे. या वास्तूला भेट द्यायची तर वाहन लावायचे कुठे हा मोठा प्रश्न पुणेकरांना भेडसावत असल्यामुळेच प्रदर्शनाकडेच पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)दैनंदिन खर्च सांभाळताना होतेय दमछाकया ठिकाणी दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या फक्त १५ ते २० इतकी आहे. अनेक वर्षे तिकिट दर हे तीन रूपयेच आहेत. त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत येथील कर्मचाऱ्यांचा पगार, देखभाल खर्च सांभाळताना दमछाक होत असल्याचे नगरसेवक उदय जोशी यांनी सांगितले.पुणे हे सांस्कृतिक शहर असून, ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. खास या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातील असंख्य पर्यटक शहराकडे आकर्षित होतात. परंतु या शहराचा इतिहास सांगणाऱ्या चांगल्या प्रदर्शनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज ज्या भावनेने हे पुण्याचे इतिहास सांगणारे प्रदर्शन मी व माझी पत्नी शुभदा जोशी हिने सर्वस्व लावून उभे केले, ते प्रदर्शन पालिकेकडे सोपविताना दु:ख होत असले तरी ते धूळ खात राहण्यापेक्षा पालिकेने त्याची जबाबदारी दुसऱ्या व्यवस्थापनाकडे सोपविली तर आनंदच आहे. परंतु यानिमित्ताने पुण्याची संस्कृती कशी लोप होत चालली आहे याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे.- उदय जोशी