शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

सचिवाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

By admin | Updated: May 24, 2014 05:07 IST

येथील वाघळवाडी विविध कार्यकारी सोसायटीतील अफरातफरी प्रकरणी संस्थेचे तत्कालीन सचिव जवाहर निगडे हे पूर्ण दोषी ठरले आहेत.

सोमेश्वरनगर : येथील वाघळवाडी विविध कार्यकारी सोसायटीतील अफरातफरी प्रकरणी संस्थेचे तत्कालीन सचिव जवाहर निगडे हे पूर्ण दोषी ठरले आहेत. तपास अधिकारी एन. एच. ताजमत यांनी अंतिम अहवालात त्यांच्यावर ५२ लाख ९८ हजार ८३३ रुपयांचा ठपका ठेवला आहे. याबाबत बारामतीचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांनी माजी सचिव जवाहर शंकरराव निगडे त्यांचे दोन जामीनदार शहाजी ज्योतीराम जगताप, तानाजी दिनकर जगताप यांच्या स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत. दि. २१ मे रोजी चौकशी अधिकारी ताजमत यांनी अंतिम अहवाल बारामतीचे सहायक निबंधकांकडे सादर केला. सचिव अनामत १९ लाख ३१ हजार ५१३ रुपये यापैकी चौकशीदरम्यान निगडे यांनी ६ लाख रुपये भरल्याचे अहवालात नमूद केले आहे. खतावणीला जमा आहे; परंतु रोजकिर्दीला जमा नाही, अशी १४ लाख ७ हजार १८३ रुपये, रोजकीर्द शिलकीमधील फरक ३४ हजार १६३ रुपये, अनामत ५६ हजार ३१३ रुपये, चेअरमन अनामत ५७ हजार रुपये मेंबर अनामत २ लाख ५९ हजार २२८ रुपये, मेंबर व्याज येणे खोटे दाखले दिले. जे कमी करण्यास अशी २१ लाख २८ हजार ४२६ रुपये तसेच आॅफिस इमारतचे ८९ हजार, असे मिळून ५२ लाख ९८ हजार ८३३ रुपये रकमेचा अपहार झाला आहे. ही रक्कम माजी सचिव जवाहर निगडे यांनी स्थावर मालमत्ता जप्तीचा आदेश भेटल्यापासून ४५ दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे. मुदतीत रक्कम न भरल्यास निगडे यांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल होणार आहे. त्यांच्या मालमत्तेतून ही रक्कम वसूल न झाल्यास त्यांचे जामीनदार शहाजी ज्योतीराम जगताप व तानाजी दिनकर जगताप यांचीही स्थावर मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. त्यातून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. तसेच, दि. ३१ मार्च २०१२ पासून या रकमेवरील १५ टक्क्यांप्रमाणे व्याजही आकारले जाणार आहे. याशिवाय, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सोमेश्वरनगर येथे अपहर झालेल्या काळातील बँक निरीक्षक दत्तात्रय बाबूराव गिरमे, शंकरराव दिनकर महानवर व विठ्ठल भाऊसाहेब वाघ या तिघांवर बँकेचे नियम डावलून बेरर चेक वढवण्यास मदत केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडून अनुक्रमे १ लाख ७५ हजार, १ लाख ५९ हजार व ३ लाख ९ हजार वसूलपात्र दिसत आहेत. अंतरिम कोडआॅफ सिव्हील प्रोसिजरच्या आॅर्डर ०-२१च्या तरतुदीचा वापर करावा. महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० चे कलम १५५, १५६ नियम १०७चा वापर वसुली अधिकार्‍यांनी करायचा, असे या आदेशात म्हटले आहे.(वार्ताहर)