शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर तालुक्यात मनसेची भाजपाबरोबर छुपी युती

By admin | Updated: February 8, 2017 02:49 IST

पुरंदर तालुक्यात सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेकडून केवळ दिवे गटातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागांवर

जेजुरी : पुरंदर तालुक्यात सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेकडून केवळ दिवे गटातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपाने हा गट पूर्णपणे सोडून इतर तीनही जिल्हा परिषदेच्या गटात व सहा पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे केले आहेत. यावरून तालुक्यात भाजपा आणि मनसेची युती असल्याची चर्चा आहे. नेते युती कोणाशीच नसल्याचे सांगत असले तरीही कार्यकर्ते मात्र अशी युती असल्याचेच खासगीत सांगतात. तालुक्यात मनसे व भाजपाची युती होणार, याबाबत ‘लोकमत’ने निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. मात्र, मनसेचे युवानेते बाबा जाधवराव यांनी आमची कोणाशीही युती किंवा आघाडी नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मात्र ही युती स्पष्ट झाली आहे. तालुक्यात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच मनसे आणि भाजपाचे घरोब्याचे संबंध राहिलेले आहेत. त्या निवडणुकीत भाजपाने मनसेचे नेते बाबा जाधवराव यांच्या बारामती तालुक्यातील भगिनी संगीताराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे जाधवराव यांनी मनसेकडून निवडणूक लढवली नव्हती. निंबाळकर यांना मनसेने मोठी ताकद दिली होती. त्यानंतर या मिनी विधानसभा निवडणुकीत भाजपाने मनसेच्या बालेकिल्ल्यात दिवे-गराडे गटात आपला एकही उमेदवार उभा केलेला नाही. इतर तीनही गटांतून भाजपाचे उमेदवार आहेत. यासाठी मनसेची मोठी मदत झाल्याची चर्चा आहे. बेलसर-माळशिरस गटात शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून काही महिन्यांपूर्वी भाजपात दाखल झालेले गणपत कड यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर याच गटातील माळशिरस गणातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महादेव शेंडकर यांच्या पत्नी मीना शेंडकर यांना उमेदवारी दिली आहे. बेलसर गटात मात्र भाजपाचेच कार्यकर्ते कैलास जगताप यांच्या पत्नी पल्लवी जगताप या उमेदवार आहेत.