शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट ओसणार, महाराष्ट्रापासूनच सुरुवात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:13 IST

प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ओसरण्यास सुरुवात होणार असल्याचा दिलासादायक ...

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ओसरण्यास सुरुवात होणार असल्याचा दिलासादायक अंदाज आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी ‘सूत्र’ नावाच्या एका मॉडेलचा वापर करून वर्तविला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रापासूनच होणार असून, रुग्णसंख्या कमी होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक सर्वप्रथम महाराष्ट्राने अनुभवला. त्यामुळे १५ मेनंतर लाट ओसरण्याची सुरुवातही महाराष्ट्रापासूनच होईल, असा अंदाज या मॅथेमिटकल मॉडेलच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी ‘सूत्र’ नावाच्या एका मॉडेलचा वापर करून कोरोनासंदर्भात गणितीय अहवाल तयार केला आहे.

यानुसार भारतात १४ ते १८ मे दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्या सर्वोच्च बिंदू गाठेल आणि तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

दुसऱ्या लाटेवर मात करणे शक्य

वेगवान लसीकरण, नागरिकांचे योग्य वर्तन आणि आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा यातूनच दुसऱ्या लाटेवर मात करता येईल, असा विश्वास वैद्यक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरू लागेल, असा दिलासादायक अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

----

तिसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील लाट ओसरायला सुरुवात होईल. दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढली. त्यानंतर इतर राज्यांमध्ये संसर्गाचा वेग वाढला. लाट ओसरतानाही याच राज्यांपासून सुरुवात होईल. सध्या देशात दररोज साडेतीन ते चार लाख रुग्ण सापडत आहेत. ही संख्या पाच लाखांच्या पुढे जाईल आणि तो लाटेचा सर्वोच्च बिंदू असेल. जेवढी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे, त्याच्या दहा पट केस रिपोर्ट होत नाहीत. लसीकरणाचा वेग वाढला तर रुग्णवाढीचा आलेख स्थिर होत जाईल. गंभीर रुग्णांची संख्याही कमी होईल. लसीकरण, नागरिकांचे योग्य वर्तन आणि कडक निर्बंध यांचे पालन केल्यास डिसेंबरपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. म्युटेशन हा या प्रवासातील महत्त्वाचा मुद्दा आहे. विषाणूमधील म्युटेशननुसार घातकता कमी होईल की वाढेल, हे अवलंबून आहे.

- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र

------

कोरोना साथीच्या वाढीची अचूक संख्यात्मक मांडणी अद्याप कोणीही करू शकलेले नाही. कोरोनाचा प्रसार डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात कमी का झाला होता, अचानक का वाढला, याबाबत डेटा उपलब्ध नाही. जे आपल्या हातात नाही, त्याबाबत अंदाज बांधण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे, त्यावर भर द्यायला हवा. आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

- डॉ. मिलिंद वाटवे, प्रसिद्ध जैवशास्त्रज्ञ